चैतन्य ताम्हाणेचा नवा सिनेमा लवकरच…

Chaitanya+Tamhane+Award

मुंबई :
जागतिक स्तरावर नावाजलेला आणि ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या ‘कोर्ट’ (२०१५) या सिनेमाचा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा नवा सिनेमा तयार झाला आहे. त्याचे नाव अजून कळले नसले तरी,  सिनेमाचे काम मात्र पूर्ण झाले आहे. 
कोर्ट मध्ये सामाजिक विषय हाताळल्यानंतर या दुसऱ्या चैतन्य मध्ये चैतन्य ‘भारतीय शास्त्रीय संगीत‘ या विषयावर आधारलेली कथा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. यावर्षी अनेक सिनेमहोत्सवांतून हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा दिग्दर्शकाचा मानस होता परंतु कोरोना आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जवळपास प्रत्येक देशात असलेले लॉकडाऊन यामुळे यावर्षीचे जवळपास सगळे इरादे बदलेले गेल्याचे कळते. या चित्रपटाचे प्रदर्शन चालू वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीस सुरळीतपणे होईल अशी चैतन्यने व्यक्त केली आहे. 
कोर्ट या सिनेमामुळे प्रसिद्धीस आलेल्या या तरुण दिग्दर्शकाचा जन्म 1 मार्च १९८७ मध्ये मुंबईमध्ये झाला असून त्याच्या या कलाकृतीला 62 व्या राष्ट्रीय पुरस्कारांत ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ पुरस्कार मिळालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here