‘F.R.I.E.N.D.S’ चे ‘रियुनिअन’ अजून लांबणार…

‘F.R.I.E.N.D.S'

जगभरात करोडे चाहते असणाऱ्या आणि शेवटचा भाग प्रसारित होऊन १६ वर्षं होऊन गेल्यानंतर सुद्धा दिवसेंदिवस प्रसिद्धी वाढत असणाऱ्या F.R.I.E.N.D.S या अमेरिकन सिटकॉमचे ‘रियुनिअन स्पेशल’ वर्जन यावर्षी मे मध्ये प्रदर्शित होणार होते. वॉर्नर ब्रदर्स या निर्मिती आणि वितरण क्षेत्रातली बलाढ्य संस्थेच्या सहायाने मे महिन्यात लॉंच होणाऱ्या HBOmax या OTT प्लॅटफॉर्मसाठी विशेष म्हणून या भागांची निर्मिती केली जाणार होती. या बातमीमुळे जगभरातील F.R.I.E.N.D.S चे चाहते आनंदात होते.
परंतु कोरोनामुळे उद्भवलेल्या एकूण परिस्थितीमुळे या भागांची निर्मिती प्रक्रिया थांबली असून ही मालिका आता पूर्वनियोजित तारखेला प्रदर्शित होणार नाही असे संबंधित व्यक्तींनी या आठवड्यात (शुक्रवार) स्पष्ट केले.
२२ सप्टेंबर, १९९४ ते ६ मे, २००४ या काळात एकूण १० सिजन्स मध्ये ही सिटकॉम प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. यामुळेच जेनिफर अनिस्तन (Jennifer Aniston) कर्तनी कॉक्स (Courteney Cox), मॅथ्यु पेरी ( Matthew Perry) लिसा कुड्रो ( Lisa Kudrow), मॅट लीब्लांक (Matt LeBlanc) आणि डेविड श्विमर ( David Schwimmer) हे चेहरे प्रत्येक घरात पोचले. आज शेवटचा भाग येऊन १६ वर्षं झाली असली तरीही इंटरनेटच्या माध्यमातून या सिरीजचे भाग पाहणाऱ्यांची संख्या काही करोडमध्ये आहे हे विशेष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here