‘RX100’ अजयच्या सिनेमात, साईची एन्ट्री?

ex100, sai pallavi

RX100 या पदार्पणाच्या सिनेमामधुन प्रसिद्धीत आलेला दिग्दर्शक अजय भूपती त्याच्या दुसऱ्या सिनेमाच्या जुळवाजुळव प्रक्रियेत व्यस्त आहे. तेलुगु चित्रपट सृष्टीत सध्या ऐकू येणाऱ्या चर्चेनुसार त्याच्या या दुसऱ्या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी लीड करणार आहे. सध्या तरी हा प्रोजेक्ट ‘महासमुद्रम’ या नावाने समोर येत आहेत.
याआधी ही भूमिका अदिती राव हैदरी करणार असल्याची चर्चा सिनेसृष्टीत रंगली होती मात्र आता ही भूमिका साई पल्लवीच्या पारड्यात गेली आहे. या दुसऱ्या सिनेमात ‘जानू’ सारखी हिट फिल्म देणारा ‘शार्वानंद’ नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसेल. अजून साई पल्लवीने याबाबत काहीही भाष्य केलेले नाही.
साई पल्लवी ही तेलुगु, तमिळ आणि मलयाळम अशा तीन ही चित्रपटसृष्टी मध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. २०१५ साली आलेल्या प्रेमम या ब्लॉकबस्टर सिनेमात तिने साकारलेली मलर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
साई पल्लवी राणा दग्गुबाती सोबत ‘वीरता पर्वम’ मध्ये काम करत आहे तसेच अक्किनेनी नागा चैतन्य सोबतही तिच्या नवीन प्रोजेक्टवर काम सुरु आहे.

ajay bhupathy, rx100

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here