अलू अर्जुनच्या ‘पुष्पा’चे पोस्टर प्रदर्शित

alu arjun pushpa


‘स्टायलिश स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेला तेलुगु अभिनेता अलू अर्जुनने त्याच्या 37 व्या वाढदिवसाचं निमित्त साधून सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा’ या नव्या सिनेमाच पोस्टर सोशल मिडीयाद्वारे लॉंच केलं. 20 वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीमधला अलूचा हा 20 वा सिनेमा आहे.
हा सिनेमा दक्षिण भारतामधल्या सगळ्यात मोठ्या जंगलातील, नल्लामालामधील रक्तचंदनच्या तस्करीवर बेतलेला आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार या सिनेमामध्ये प्रसिद्ध तमिळ अभिनेता विजय सेतूपथी खलनायकाच्या भूमिकेत पेक्षकांसमोर येईल. विजयची ही तेलुगु मधील दुसरीच फिल्म असून याआधी त्याने चिरंजीवीच्या ‘श्री नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटातून तेलुगु सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. अलू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अशी जोडी या सिनेमातून पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर येईल. हा सिनेमा सुकुमारचा मेगा प्रोजेक्ट असून एकाच वेळी तेलुगु, तमिळ, कन्नड, मलयाळम आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल.
vijaysethupathi
अलू अर्जुन आणि सुकुमार या जोडीचा हा तिसरा ( एक लघु चित्रपट वगळता : I am that change, 2014 ) सिनेमा आहे. अलू अर्जुनची सिने कारकीर्द के.राघवेंद्र राव यांच्या गंगोत्री
(2003) मधून झाली असली तरी त्याचा पहिला सुपरहिट सिनेमा सुकुमारचा ‘आर्या’ (2004) हा होता जे सुकुमारचं दिग्दर्शकीय पदार्पण होतं. या सिनेमासाठी हे दोघं 10 वर्षांनी एकत्र येत
आहेत.
‘पुष्पा’ची निर्मिती वाय.नवीन आणि वाय.रवी शंकर यांची असून सिनेमाचं संगीत देवीश्रीप्रसाद यांचं असणार आहे तर छायाचित्रण प्रसिद्ध पोलिश कॅमेरामन Miroslaw Kuba Brozek यांचं
असणार आहे. हा सिनेमा 2020 अखेरीस किंवा 2021च्या पहिल्या महिन्यात प्रदर्शित होईल.
alu arjun pushpa

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here