‘लुसिफर’ तेलुगू रिमेकमध्ये चिरंजीवी मुख्य भूमिकेत

Chiranjeevi to star in Lucifer Telugu remake

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर मल्याळम सिनेमा (Lucifer) ‘लुसिफर’चा तेलुगु रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूरला घेऊन केलेल्या बिगबजेट फिल्म ‘साहो’चा दिग्दर्शक सुजित हा सिनेमा तयार करतोय. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये या सिनेमात आपण मुख्य भूमिका साकारात असल्याचे तेलुगु मेगास्टार चिरंजीवी याने स्पष्ट केले.
सिनेसृष्टीत चाललेल्या चर्चेनुसार या मल्याळम चित्रपटाच्या तेलुगु रिमेकसाठीचे हक्क चिरंजीवीने विकत घेतले असून त्याची निर्मिती त्याच्या होम प्रोडक्शन ‘कोनिडेला प्रोडक्शन’ या बॅनर खाली होईल. या सिनेमाचे शूटिंग चिरंजीवीच्या चालू असलेल्या प्रोजेक्ट्सच्या पूर्ततेनंतर सुरु होईल. सध्या मूळ मल्याळम सिनेमाच्या संहितेत तेलुगु प्रेक्षकांनुसार बदल करण्याची प्रक्रिया सुरु आहे असे चिरंजीवीकडून कळते.
मूळ मल्याळम सिनेमामध्ये मोहनलालने मुख्य भूमिका साकारली असून त्याच्यासोबत विवेक ओबेराय, मंजू वॉरियर यांच्या भूमिका होत्या. हा सिनेमा अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याचे दिग्दर्शकीय पदार्पण सुद्धा होते. २०१९ च्या व्यावसयिक वर्षात या सिनेमाने एकूण २०० करोड रुपयांचा व्यवसाय केला होता.
Chiranjeevi to star in Lucifer Telugu remake

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here