…आणि आता ‘फॉर मोअर शॉट्स प्‍लीज!’चा सांगीतिक अवतार

Four more shots please S2

मुंबई : 
पहिल्या सीझनमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या ‘फॉर मोअर शॉट्स प्‍लीज’ (four more shots please!) च्या दुसऱ्या सिझनची वाट प्रेक्षक बघत आहेतच. १७ एप्रिल रोजी याचा दुसरा सिझन अमेझॉन प्राईम वर प्रसिद्ध होणार असून, तत्पूर्वीच या सीझनचा सांगीतिक अवतार म्हणता येईल असा ८ गाण्यांच्या संगीत अल्बम प्रसिद्ध झाला आहे. अमेझॉन प्राईमच्या सदस्यांना हा अल्बम पाहता येणार असून, या अल्‍बममध्‍ये मिकी मॅकक्‍लेरी व दर्शन रावल यांची ७ नवीन गाणी आणि एका रिमिक्‍सचा समावेश आहे. हा अल्‍बम शोच्‍या कथानकाला पुढे घेऊन जाण्‍यासोबत प्रत्‍येक पात्राच्‍या वैयक्तिक कथेला आकार देतो. पहिल्या सिझनला संगीत देणाऱ्या मिकी मॅकक्‍लेरीनेच  या रिजिनल साऊण्‍डट्रॅकची निर्मिती केली आहे. 
इथे ऐका फोर मोअर शॉट्स प्‍लीज S2 अल्बम : https://bit.ly/fourmoreshotsplease

फोर मोअर शॉट्स प्‍लीज! (four more shots please!) या अल्‍बममध्‍ये रोमँटिक क्षणांपासून आत्‍म-शोध प्रवास, चरित्र संघर्ष व शोच्‍या अनेक मूड्सना सादर करणारी, तसेच चार अपूर्ण महिलांमधील मैत्रीच्‍या भावनिक प्रवासाला सादर करणारी पेपी पार्टी, बॅलड्स, रोमँटिक गाण्‍यांचा समावेश आहे. या नवीन अल्‍बममध्‍ये पहिल्‍या सीझनचे लोकप्रिय शीर्षक गाणे व अॅन्‍थेमचे नवीन रूपांतरण, तसेच दर्शन रावलचे मैत्रीपूर्ण बॅलड ‘यारा तेरी यारी’ या गाण्‍यांचा देखील समावेश आहे. हे खास साऊंउट्रॅक्‍स अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्‍ध आहेत आणि गाणी इतर म्‍युझिक स्ट्रिमिंग सेवांपूर्वी आठवडाभर संगीतश्रोत्‍यांना विना जाहिरात  अॅमेझॉन प्राइम म्‍युझिकवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

https://cinenama.in/2020/04/14/ek-thi-begum-powerpack-crime-web-series-story/

fourmoreshotsplease

काय आहे Four more shots please! सिझन २ मध्ये… :

चार जिवलग मैत्रिणी पुन्‍हा एकदा एकत्र येत जगाला महिलांना खरेच काय अपेक्षित असलेल्‍या गोष्‍टींकडे लक्ष देण्‍यास सांगणार आहेत. या मुली आपल्‍या मैत्रीणींसोबत खंबीर उभ्‍या आहेत. त्‍यांच्‍या समस्‍या साध्‍या वाटल्‍या तरीही एकमेकींसाठी जटिल व मजेशीर देखील आहेत. त्‍या नवीन चुका करतील, पण नीडरपणे एकमेकींवर काहीसे अधिक प्रेम करतील आणि समाजाच्‍या अपेक्षांना झुगारून स्‍वत:चे जीवन जगतील. पॉप संस्‍कृती दर्शवणारी सिरीज फोर मोअर शॉट्स प्‍लीज! एक गोष्‍ट निश्चित सादर करेल, ती म्‍हणजे तुम्‍हाला आधुनिक भारतीय महिलांची मानसिकता दाखवेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here