‘Cannes’ जूनमध्ये घेणार वर्च्युअल फिल्म मार्केट?

Cannes festival

कोरोना आणि त्याच्या पडसादांमुळे कुठलेच मोठे सोहळे किंवा इव्हेंट होण्याची शक्यता धूसर आहे. चित्रपट महोत्सवही त्याला अपवाद नाहीत. जगात सगळ्यात जास्त महत्वाचा समजला जाणारा ‘कान’ (Cannes) महोत्सव’ सुद्धा यावर्षी आयोजित केला जाईल की नाही याबाबत अजून काहीही ठोस भूमिका आयोजकांकडून घेतली गेलेली नसली तरीही या महोत्सवात विविध चित्रपटांसाठी भरवले जाणारे ‘मार्केट’ आयोजक येत्या जून मध्ये डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने वर्च्युअली घेण्याच्या विचारात असल्याचे कळते.
Marché du Film अर्थात कान (Cannes) फिल्म बाजारच्या आयोजकांनी 18 मे ला याबाबतची भूमिका स्पष्ट केली.

https://cinenama.in/2020/04/15/overview-about-ahirani-movie-industry/

‘महोत्सवाच्या मूळ प्लानिंग नुसार आता आयोजन शक्य नाही मात्र आम्ही डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने वर्च्युअली Marché du Film अर्थात महोत्सवामधील फिल्म बाजार घेण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष एमान्युएल माक्रोन यांनी १३ एप्रिल पासून जुलै पर्यंत देशात सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. 
Cannes festival

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here