‘Mrs. serial killer’ चा प्रीमियर 1 मे ला…

Mrs. serial killer

गेल्या वर्षी नेटफ्लिक्स इंडियाने शिरीष कुंदर दिग्दर्शित आणि फरह खान निर्मित ‘ मिसेस सिरीयल किलर’ (mrs. serial killer) या सिनेमाची घोषणा केली होती. हा सिनेमा 1 मे पासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध होणार आहे. यात जॅकलीन फर्नाडीस आणि मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. याबाबत प्रमोशन करणारा एक विडीओ नेटफ्लिक्सने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये जॅकलीन आणि मनोज यांची हसीमजाकवाली नोकझोक चालू आहे.
‘मिसेस सिरीयल किलर’ (mrs. serial killer) ही कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या पतीच्या सूडासाठी खून करणाऱ्या स्त्रीची कथा आहे. गेल्या वर्षीच्या सुपर फ्लॉप ‘ड्राइव्ह’ नंतर जॅकलीनचा नेटफ्लिक्स सोबतचा हा दुसरा सिनेमा आहे. मनोज वाजपेयीने नुकतंच त्याच्या वेब सिरीज ‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या भागाचे चित्रीकरण संपवले. मात्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये तो उत्तराखंडमध्ये अडकल्याचे कळते. तिथे त्याच्या नवीन सिनेमाचे चित्रीकरण चालू होते.
Mrs. serial killer, cinenama

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here