अभिनेते, लेखक रणजीत चौधरी यांचं निधन

ranjeet choudhari

सिनेमा आणि नाट्य अभिनेते रणजीत चौधरी यांचं काल वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झालं. त्यांची बहिण आणि प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका राईल पदमसी यांनी समाज माध्यमांवर याबाबत
माहिती दिली.
https://twitter.com/IamDeepaMehta/status/1250586742375120896

दीर्घ काळापासून त्यांचं वास्तव्य अमेरिकेत होते. खट्टा मिठा (१९७८), बातो बातो में (१९७९), खुबसुरत (१९८०), सारख्या सिनेमांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी हॉलीवूड मध्ये काम करण्यासाठी अमेरिकेत स्थलांतर केलं. प्रीजन ब्रेक या गाजलेल्या अमेरिकन टीवी शो मधील त्यांची भूमिका विशेष लक्षात राहिली. रणजीत हे प्रसिद्ध अभिनेत्री पर्ल पदमसी यांचे चिरंजीव होते. रणजीत यांनी आजपर्यंत एकूण ४० सिनेमात काम केले आहे. दीपा मेहता, राहुल खन्ना, पूर्णा जगन्नाथन यासारख्या अनेक मान्यवरांनी समाज माध्यमांवर व्यक्त होतं आपला शोक व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here