झी-५ चा लहान मुलांसाठी #नॉनस्टॉप बचफन

Z5, nonstop bachfun

लहान मुलांसाठी लवकरच सादर करणार गॅजेट गुरू, गुड्डू आणि बापू

मुंबई :
ई लर्निंगपासून ऑनलाइन गेम्सपर्यंतच्या कित्येक गोष्टींमुळे मुले जास्त वेळ स्क्रीनचा वापर करत असतात. आजच्या मुलांसाठीचे मनोरंजनही काही वेगळे नाही. झी-५ भारतातील मनोरंजनाचे सुपरअप मुलांसाठी खास तयार केलेला आशय दर्शवणारे झी5 किड्स लाँच करण्यासाठी सज्ज होत आहे. यावर ४००० पेक्षा जास्त तासांचा मनोरंजनक कंटेंट असून तो वेगवेगळे विभाग, भाषा, फॉरमॅट, वयोगट यांनुसार खास तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण कंटेंट पूर्णपणे मोफत आहे.

मुलांचे सर्व प्रकारचे वयोगट आणि भाषांसाठी बनवण्यात आलेल्या कंटेट लाइन-अप ट्रेलरसह झी-५ किड्स खास डिजिटल कार्यक्रमही लाँच करणार असून त्यात गॅजेट गुरु, गुड्डु आणि बापू यांचा समावेश आहे. हे कार्यक्रम लवकरच प्रदर्शित केले जातील. नऊ भाषांत तयार केलेले शोज व सिनेमे तसेच लहान मुले आणि पालकांसाठीच्या खास कार्यक्रमांमुळे झी-५ सध्या संपूर्ण कुटुंबाच्या मनोरंजनाचे ठिकाण बनले आहे. अनोख्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या झी-५ किड्सवर  मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, कन्नड, तेलुगु, बंगाली, मल्याळम आणि भोजपुरी अशा विविध भाषांतील संग्रही कार्यक्रमही दाखवले जाणार आहेत.

लाँचविषयी झी-५ इंडिया ऍपच्या प्रोग्रॅमिंग प्रमुख अपर्णा आचरेकर म्हणाल्या, ‘झी-५ किड्स अद्यावत निर्मिती सादर करताना अतिशय आनंद होत आहे. झी-५ किड्स लहान मुलांच्या शिक्षण आणि मनोरंजक विषयक गरजा सुरक्षित वातावरणासह पूर्ण करणारे अनोखे सादरीकरण आहे. हे उत्पादन मजेदार पद्धतींच्या मदतीने मुलांच्या बौद्धिक क्षमता रूंदावणारे असून त्यात नऊ भाषांतील व विविध प्रकारची बालगीते, कार्यक्रम, सिनेमे, रिअलिटी आणि डीआयवाय शोज यांसारखा खास तयार करण्यात आलेल्या कंटेंटचा समावेश आहे. उपकरण वापराची वृत्ती तसेच डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आजकालच्या मुलांसमोर खुला होणारा माहितीचा अमर्याद साठा लक्षात घेत याचे फ्रेमवर्क जास्त सुरक्षितपणे तयार करण्यात आले आहे. आम्हाला खात्री आहे, की झी-५ किड्सच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रेक्षकांमध्ये #नॉनस्टॉपबचफन ची सवय रूजवू शकू.’
Z5, nonstop bachfun

झी-५ किड्सवरील कंटेंटमध्ये संपादित आणि लायन्सगेट व कॉसमॉस माया यांसारख्या आघाडीच्या निर्मिती संस्थांनी तयार केलेल्या खास शोजचा मेळ घालण्यात आला आहे. येत्या काही महिन्यांत पुढील तीन डिजिटल शोज लाँच केले जाणार आहेत

·       गॅजेट गुरू – सुपरहिरो व्यक्तीरेखेवर आधारित अनिमेटेड टीव्ही शो आणि सिनेमांची मालिका, जी मुलांना साहस सफरीवर घेऊन जाईल.

·       गुड्डू – मजेदार सिंह आणि त्याच्या मित्रांची गोष्ट, जे बिल्लोरी नावाच्या दुष्ट मांजरीशी आणि तिच्या गँगविरोधात मोठ्या धाडसाने लढा देतात.

·       बापू – परिस्थितीजन्य, हलकाफुलका विनोद आणि शैक्षणिक मालिका, जी बापू म्हणजेच मोहनदास करमनंद गांधी व त्यांच्या महान कार्याची माहिती देईल.

कंटेंट कंपनी या नात्यने झी5 किड्सचा इंटरफेज मुलांसाठी सुरक्षित आहे. त्याशिवाय हा प्लॅटफॉर्म मुलांसाठी वापरायला सोपा आहे. झी-५ किड्स लहान मुले, पालक व शिक्षकांना कुटुंब म्हणून एकत्र येत मजा घेण्यासाठी, निर्मिती करण्यासाठी, शिकण्यासाठी व योगदान देण्यासाठी पूरक वातावरण तयार करणारा आहे.

समाजोपयोगी उपक्रमांचा एक भाग म्हणून झी-५ किड्स मातांना यावरील वैविध्यपूर्ण कंटेंट लाइन अप, सुरक्षेच्या उपाययोजना, स्मार्ट वैशिष्ट्ये यांची ब्लॉग्ज, मालिका, मजेदार आव्हाने आणि शिकवणी यांच्या माध्यमातून शिक्षित करणार आहे. त्याशिवाय हा प्लॅटफॉर्म आणि त्यावरील सोशल हँड्ल्स मानसिक आरोग्य तज्ज्ञ, पोषण तज्ज्ञ, क्रीडा प्रशिक्षक यांच्याबरोबर लाइव्ह चॅटचे आयोजन करणार असून त्यातून पालकांना मुलांच्या एकंदरीत स्वास्थ्याविषयी खास टिप्स व सल्ले मिळतील. # नॉनस्टॉपबचफनमुळे ब्लॉग्ज लिहिणाऱ्या माता, इन्फ्लुएन्सर्स आणि आयांना आपल्या मुलांबरोबरचे बचफन व्हिडिओज व क्षण शेयर करून आकर्षक बक्षिसे जिंकता येतील. या मजेत भर घालणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, सर्वोत्तम व्हिडिओज व व्ह्लॉग्जला झी5 च्या सोशल मीडिया पेजेवर झळकण्याची संधी दिली जाईल.

आकर्षक शोज आणि सिनेमे असोत किंवा मजेदार खेळ असोत, #नॉनस्टॉपबचफन कायमच झी 5 किड्सचा मुख्य गाभा राहील. लवकरच संपूर्ण कुटुंबाच्या अमर्यादित मनोरंजनासाठी आम्ही आणखी बरंच काही घेऊन येत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here