‘अर्थ डे’ कॉन्सर्टमध्ये भेटणार ‘ग्रॅमी’ विजेते

earth day

मुंबई :
जागतिक अर्थ डेनिमित्त मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीची सोशल आणि प्रोफेशनल नेटवर्किंग साइट असलेल्या वनपेज स्पॉटलाइटने २२ एप्रिल रोजी ६० मिनिटांची ऑनलाइन कॉन्सर्ट आयोजित केली आहे. यात ५ ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांसह ६ देशांतील ४० संगीतकारांचा समावेश असेल. जगातील १३ शहरांमधून कलाकार आणि संगीतकार त्यांच्या घरातूनच या कॉन्सर्टमध्ये आपली कला सादर करतील. सर्वजण घरात रहा, सुरक्षित रहा या संदेशाचा प्रसार करत असून याच पार्श्वभूमीवर जागतिक लॉकडाउनमध्ये ऐक्याचा आणि कोरोनाशी जिद्दीने लढण्याचा संदेश या कलाकृतींमार्फत देण्यात येणार आहे.
जगभरातील प्रेक्षक लक्षात घेता या कॉन्सर्टचे लाइव्ह स्ट्रीमिंग भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता आणि पाश्चिमात्य वेळेनुसार, रात्री ८ वाजता या दोन वेळेत होईल. सर्व प्रेक्षक डब्ल्यूएचओ, डब्ल्यूडब्ल्यूएफ, अर्थ डे नेटवर्क, यूएनएफसीसीसी, यूएनसीसीडी, युनिसेफ आणि वनपेजस्पॉटलाइटच्या अधिकृत हँडल्सवर (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब) ही कॉन्सर्ट पाहू शकतील.
ग्रॅमी विजेते अमेरिकन संगीतकार, संगीत निर्माते आणि पर्यावरणतज्ज्ञ रिकी केज म्हणाले, ‘आपली पृथ्वी नाजूक असून तिचे संरक्षण करणे गरजेचे आहे, याबद्दल जागरूकता निर्माण करणे ही या कॉन्सर्टमागील मूळ संकल्पना आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे लोक, प्रजाती आणि पर्यावरणीय प्रणालीला धोका निर्माण झाला आहे. आम्ही जगातील प्रत्येकाला पुढे, एकत्र येऊन आपण जिथे राहतो, त्या पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी सकारात्मक आणि शाश्वत बदल करण्याचे आवाहन करत आहोत.”
earth day,

https://cinenama.in/2020/04/20/elizabeth-movie-review/

कॉन्सर्टसाठी एकत्र येणारे कलाकार :
• रिकी केज, ग्रॅमी पुरस्कार विजेते, प्रख्यात आंतरराष्ट्रीय संगीतकार, यूएस बिलबोर्ड नंबर#1आर्टिस्ट(बंगळुरू, भारत)
• सेनगल्स सिंगर बाबा माल (सेनेगल)
• ग्रॅमी पुरस्कार विजेते लउरा डिकेनसन (लॉस एंजल्स, अमेरिका)
• दक्षिण आफ्रिकन बासरीवादक, ग्रॅमी पुरस्कार विजेते, वोउटर केल्लेरमन (मेलबर्न, ऑस्ट्रेलिया)
• भारतीय शास्त्रीय संगीत वादक पद्मभूषण विश्व मोहन भट्ट (जयपूर, भारत)
• गयाक, गीतकार, लोनी पार्ट (न्यूयॉर्क, अमेरिका)
• आफ्रिकेतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या ३० सदस्य चर्चमधील मिझान्सी यूथ कोअर (दक्षिणआफ्रिका)
• जगातील अग्रगण्य डन ट्रान्ह संगीतकार हाई फुओंग (हो ची मिन्ह, व्हिएतनाम)
• व्हायोलिनवादक व संगीतकार मनोज जॉर्ज (बंगळुरू, भारत)
• मास्टर ऑफ कार्नटिक परकशन : अरुण कुमार (बंगळुरू, भारत)
• गायिक, गीतकार, संगीतकार विजया शंकर (मुंबई, भारत)
• पुरस्कार विजेत्या गायिका आणि बासरीवादक वारीजयश्री (बंगळुरू, भारत)
• संगीतकार, गीतकार, गायक आयपी सिंग (मुंबई, भारत)
• रिव्होलुशन कोअर (बंगळुरू, भारत)
• जागतिक ख्यातीचे स्पीड पेंटर विलास नायक (बंगळुरू, भारत)
earth day, grammy
https://thebusinesstimes.in/wow-robot-to-help-aiims-doctors-fight-corona-virus/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here