महाराष्ट्र दिनी ‘एबी आणि सीडी’ चा डिजिटल प्रीमिअर

ab aani cd

मुंबई : 
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने निर्माता अक्षय बर्दापूरकरसोबत सहयोगाने आज महाराष्‍ट्र दिनी नुकताच प्रदर्शित झालेला विनोदी चित्रपट ‘एबी आणि सीडी’चे डिजिटल प्रिमिअर सादर केले जाणार असल्‍याची घोषणा केली. ‘एबी आणि सीडी’ या चित्रपटामध्‍ये सुपरस्‍टार अमिताभ बच्‍चन यांच्‍यासह दिग्‍गज मराठी अभिनेता विक्रम गोखले आहेत. ‘एबी आणि सीडी’ हा देशव्‍यापी लॉकडाऊनमुळे चित्रपटागृहामध्‍ये प्रदर्शित न होऊ शकलेल्‍या काही चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट महाराष्‍ट्र दिन म्‍हणून साजरा केला जाणा-या १ मे २०२० रोजी डिजिटल पदार्पण करण्‍यास सज्‍ज आहे. हा चित्रपट सध्‍याच्‍या कठीण काळामध्‍ये कोविड-१९ विरोधात लढणा-या योद्धांना मानवंदना देणार आहे. मिलिंद लेले यांनी ‘एबी आणि सीडी’ चित्रपटाचे दिग्‍दर्शन केले आहे.
ab aani cd
लॉकडाऊन लव्ह : देशातील पहिले वर्च्युअल नाटक

निर्माता अक्षय बर्दापूरकर म्‍हणाले, ”सद्यस्थितीमध्‍ये लोकांची सुरक्षितता व आरोग्‍य अत्‍यंत महत्त्वाचे आहे. म्‍हणूनच आमचे स्ट्रिमिंग भागीदार अॅमेझॉन प्राइम व्हिडिओसह या चित्रपटाचे डिजिटली पदार्पण करण्‍याचे ठरवण्‍यात आले. प्राइम व्हिडिओसोबत सहयोगाने आम्‍हाला कोविडविरोधातील लढ्यातील सर्व हिरोंना मानवंदना म्‍हणून महाराष्‍ट्र दिनी, म्‍हणजेच कामगार दिनी हा चित्रपट प्रदर्शित करण्‍याचा आनंद होत आहे. दीर्घकाळापर्यंत स्‍मरणात राहणा-या या अथक प्रयत्‍नांना आमची ही एक विनम्र मानवंदना आहे.” ‘एबी आणि सीडी’ हा भावी काळाशी निगडित भावपूर्ण चित्रपट आहे. या चित्रपटामध्‍ये बच्‍चन व गोखले हे दोन बालवाडीमधील मित्र आहेत, जे एका वाढदिवसाच्‍या पार्टीमध्‍ये जवळपास ७० वर्षानंतर भेटतात. मिलिंद लेलेद्वारे दिग्‍दर्शित या मराठी चित्रपटामध्‍ये अमिताभ बच्‍चन व विक्रम गोखले प्रमुख भूमिकेत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here