लॉकडाऊन लव्ह : देशातील पहिले वर्च्युअल नाटक

lockdown love

मुंबई : 
कोरोनामुळे जगभरात असलेल्या लॉकडाऊनला संधीमध्ये रुपांतर करत अनेक कलाकार वेगवेगळ्या कल्पना घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. अशीच एक भन्नाट कल्पना घेऊन दिग्दर्शिका शिना खलिद भारतातलं पहिलं वर्च्युअल नाटकं घेऊन आले आहेत.
‘लॉकडाऊन लव्ह’ असं या नाटकाचं नाव असून यात श्रिया पिळगावकर आणि प्रियांशू पैनयुली हे दोघे प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येतील. प्रसिद्ध नाटककार जोनाथन रँड लिखित ‘चेक प्लीज’ या नाटकावर हे नाटक आधारलेलं आहे. यां नाटकात श्रिया-प्रियांशू सोबतच तन्मय दनानिया, अश्विन मुश्रन, किरा नारायणन आणि स्वत: दिग्दर्शिका सहायक भूमिकेत असतील.
हे नाटक प्रेक्षांकांसमोर केव्हा येणार याची तारीख निश्चित झाली नसली तरीही हे नाटक zoom app च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
lockdown lovelockdown love
‘अर्थ डे’ कॉन्सर्टमध्ये भेटणार ‘ग्रॅमी’ विजेते
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here