अजय देवगणच्या ‘रेड’ चा सिक्वेल येणार…

raid

२०१८ मध्ये हिट ठरलेल्या ‘रेड’ या सिनेमाचा सिक्वेल येत असल्याची बातमी बी टाऊन मध्ये जोरदार फिरत आहे. याही सिनेमात मूळ सिनेमा प्रमाणे अजय देवगण मूळ भूमिकेत असणार असून इतर कलाकारांबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही.
साध्य या नवीन सिनेमाच्या संहितेवर काम सुरु असल्याच समजतं. मूळ सिनेमाचे निर्माते सामान्य लोकांसारखे नायक सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याच्या फ्रेन्चायाजी बाबत विचार सुरु  असल्याचे ही सूत्रांकडून समजते.
२०१८ सालच्या रेड चे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता याचे होते परंतु या सिक्वेलच्या दिग्दर्शनाबाबत कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. लॉक डाउनच्या आधी अजय देवगण अमित शर्माच्या ‘मैदान’ वर काम करत होता. यावर्षी त्याचे मैदान सह थँक गॉड आणि नीरज पांडेच्या चाणक्य हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतील.
raid 2
महाराष्ट्र दिनी ‘एबी आणि सीडी’ चा डिजिटल प्रीमिअर
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here