सोनीवर आला अदृश्य सुपरहिरो

hero

सोनी सब हे भारताचे आघाडीचे हिंदी सामान्‍य मनोरंजन चॅनेल प्रेक्षकांसाठी रोमांचक नवीन मालिका ‘हिरो’ सादर करण्‍यास सज्‍ज आहे. या मालिकेमधील नवीन सुपरहिरो पृथ्‍वीला लक्ष्‍य केलेल्‍या दुष्‍ट एलियन सेनेशी लढा देतो.

झी-५ चा लहान मुलांसाठी #नॉनस्टॉप बचफन

सध्‍याच्‍या कठीण काळामध्‍ये आशेचा किरण दाखवत सोनी सबने प्रेक्षकांना मनोरंजनाचा नवीन डोस देण्‍यासाठी मालिका ‘हिरो’ सादर केली आहे. अदृश्‍यता ही त्‍याची सुपर पॉवर आहे आणि तो अशक्‍य गोष्‍टी शक्‍य करण्‍याचे धाडस करतो. ही काल्‍पनिक मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करणा-या बालवीर व अलाद्दिन सारख्‍या काल्‍पनिक मालिकांमध्‍ये एक लक्षणीय भर असेल.संपूर्ण कुटुंबाला हलक्‍या-फुलक्‍या मनोरंजनाचा आनंद देण्‍याशी कटिबद्ध असलेले सोनी सब चॅनेल या नवीन काल्‍पनिक मालिकेसह त्‍यांच्‍या मालिकांचा आवाका वाढवण्‍यासाठी सज्‍ज आहे.
hero

इथे पहा अदृश्य हिरोची झलक : https://www.facebook.com/watch/?v=241972917045322

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here