अमेझॉन प्राईमवर तापसीचा ‘थप्पड’

tappad


मुंबई :
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव आणि त्यामुळे देशभरातील वाढत्या लॉकडाऊनचा फटका अनेक चांगल्या सिनेमाना बसला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्य आठवड्यात देशभरात प्रदर्शित झालेला आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असलेला  अभिनव सिन्हाच्या थप्पड सिनेमाला लॉकडाऊनमुळे उर्वरित शो उतरावावे लागले त्यामुळे अनेकांना त्यापासून वंचित राहावे लागले. पण आता महिनाभरातच थप्पडचा डिजिटल प्रीमिअर होत असून, १ मे रोजी अमेझॉन प्राईमवर थप्पड बघता येणार आहे.
अनुभव सिन्‍हाद्वारे निर्मिती व दिग्‍दर्शन असलेल्‍या या चित्रपटाचे लक्षवेधक पटकथा आणि उत्तम कलाकारांच्‍या अप्रतिम अभिनयासह रुढी व प्रथांना मोडून काढण्‍याबाबत समीक्षकांनी कौतुक केले आहे. १ मे पासून २०० देश व प्रदेशांमधील प्राइम सदस्‍य चित्रपटगृहामध्‍ये प्रदर्शित झाल्‍यानंतर तापसी पन्‍नू अभिनीत हा चित्रपट पाहू शकणार आहेत.
thappad 
महाराष्ट्र दिनी ‘एबी आणि सीडी’ चा डिजिटल प्रीमिअर

या डिजिटल प्रीमिअरच्या निमित्ताने या सिनेमातील मुख्य अभिनेत्री तापसी पन्‍नूने सांगितले कि, मी या चित्रपटाचा भाग बनण्‍यासाठी खूपच उत्‍सुक होते. या प्रकल्‍पासाठी अनुभव सरांसोबत काम करणे हा माझ्यासाठी सन्‍मान आहे. त्‍यांनी एका संवेदनशील विषयाला अत्‍यंत प्रभावीपणे सादर केले आहे. मी बालपणापासूनच स्‍वभावाने बंडखोर राहिली आहे आणि ते माझ्या निवडलेल्‍या चित्रपटांमधून दिसून येते. गेले ६ महिने माझ्यासाठी अत्‍यंत रोमांचक राहिले आहेत. अॅमेझॉन ओरिजिनल सिरीज ‘वन माइक स्‍टॅण्‍ड’मध्‍ये स्‍टॅण्‍ड-अप कॉमेडी करण्‍यापासून ‘थप्‍पड’ चित्रपटामध्‍ये ही अविश्‍वसनीय भूमिका साकारण्‍यापर्यात मला माझे अभिनय कौशल्‍य वाढवण्‍याची संधी मिळाली. मला आनंद होत आहे की, प्रेक्षक आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर ‘थप्‍पड’ चित्रपट पाहू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here