प्रख्यात अभिनेते इरफान खान यांचे निधन

irrfan

मुंबई :
आपल्या नैसर्गिक अभिनय शैलीमुळे बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणार्‍या इरफान खान यांचे वयाच्या 53 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. 2018 मध्ये न्यूरोइंडोक्राईन ट्यूमरसारख्या दुर्धर आजार झाल्यानंतर त्यांच्यावर इंग्लंडमध्ये उपचार सुरु होते. त्यातून ते बर्‍यापैकी सावरले होते पण काल संध्याकाळी पोटातील संसंर्गामुळे त्यांची तब्बेत पुन्हा एकदा बिघडल्यानंतर त्यांना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुतापा सिकदर आणि बाबिल व अयान ही दोन मुले आहेत.
irfan-khan-dies
इरफान खानचं ‘ते’ वेदनादायी पत्र

इरफानच्या ‘पिकू’ सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत सरकार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून इरफान खान यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. ‘माझा प्रिय मित्र इरफान, तू लढलास, लढलास आणि अखेरपर्यंत लढत राहिलास. मला तुझा नेहमीच अभिमान वाटत राहिल. लवकरच भेटूया. सुतापा आणि बाबिल यांच्याप्रती सहवेदना. तुम्ही सुध्दा त्याच्यासाठी लढलात. सुतापा तू त्याच्या या लढाईत शक्य ते सगळे केलेस. शांती आणि ओम शांती, इरफान खान सॅल्यूट’ असा संदेश सुजीत सरकारने नोंदवला आहे.
गेल्या शनिवारी इरफान यांच्या मातोश्री सईदा बेगम (95) यांचे निधन झाले होते. लॉकडाउनमुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला इरफान यांना उपस्थित राहता आले नव्हते, त्यामुळे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी आईचे अंत्यदर्शन घेतले होते.
2019मध्ये इंग्लंडमधून परत आल्यानंतर इरफान खान यांनी पुन्हा एकदा चित्रिकरणाला सुरुवात केली होती. ‘अंग्रजी मीडिअम’ या त्यांची प्रमुख भूमिका असलेला शेवटचा सिनेमा मार्च 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here