…आणि आज ऋषी कपूर!

rishi kapoor

मुंबई :
कालच्या इरफानच्या बातमीतून देश सावरला नसतानाच आज सकाळी दुसऱ्या एका बातमीने देशाला धक्का दिला. दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला.  इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी ट्विट केली. ‘तो गेला…ऋषी कपूर गेलेत… मी तुटलोय… , असे ट्विट त्यांनी केले. कपूर कुटुंबातून अभिनेते रणधीर कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ऋषी कपूर गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी लढत होते. काल रात्री उशिरा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांची त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेत. पण  हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत. 2018 मध्ये ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. तेथे 11 महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते.
rishi kapoor
इरफान : द वॉरिअर

ऋषी कपूर यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पहिलाच सिनेमा ‘बॉबी’ सुपरडुपर हिट झाला.  १९७३ च्या बॉबी पासून २००० पर्यंत ऋषीकपूर हे नायकाची रोमांटिक भूमीका करीत होते. या दरम्यान त्यांनी ९२ चित्रपटात काम केले, त्यापैकी ५१ चित्रपटात ते सोलो हिरो होते तर ४१ मल्टिस्टारर सिनेमे होते. या दरम्यान त्यांनी जवळपास सर्वच अभिनेत्रीसोबत नायक म्हणून काम केले होते. २००० पर्यंत रोमांटिक भूमिका केल्यानंतर त्यांनी सहायक अभिनेता म्हणून भूमिका साकारायला सुरुवात केली तर त्याच्या अभिनयाचे वैविध्य दिसून आले.  नमस्ते लंडन, औरंगझेब, हाउसफुल्ल 2, स्टूडेंट आॅफ द ईयर, अग्निपथ अशा व अशाच अनेक हिट सिनेमात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here