सत्यजित ‘अ रे ऑफ जीनीयस’

नवी दिल्ली :
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वस्तुसंग्रहालय आणि सांस्कृतिक स्थळ जतन विभागाने ‘अ रे ऑफ जीनीयस’ या लघुपटाच्या प्रदर्शनाद्वारे आज प्रख्यात सिनेनिर्माता सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दी वर्ष  सोहळ्याची सुरुवात  केली.
हा लघुपट रे यांच्या चित्रपट निर्मिती कलेतील प्रविण्याला अधोरेखित करतो तसेच कोलकाता आणि मुंबई इथल्या  साहित्य, कला, संगीत आणि रचना इत्यादी क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये त्यांचे निर्विवाद श्रेष्ठत्व सिध्द करतो असे उद्गार वस्तुसंग्रहालय आणि सांस्कृतिक स्थळ जतन विभागाचे अध्यक्ष राघवेंद्र सिंग यांनी या लघुपटाचे ऑनलाईन प्रसारण करताना काढले. संदीप रे तसेच सोसायटी फॉर द प्रिझर्वेशन ऑफ सत्यजित रे अर्काईव्हज या संस्थेच्या मदतीने पारितोषिक विजेते दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी आणि संपादक अर्घ्य कमाल मित्र यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात रे यांच्यासोबत तीस वर्ष काम करणारे आणि त्यांच्या ऐतिहासिक कारकीर्दीचे साक्षीदार असलेले नेमई घोष यांची दिल्ली आर्ट गॅलरीच्या संग्रहातून मिळालेली काही उत्तम छायाचित्रे देखील पाहायला मिळतात अशी माहिती त्यांनी दिली.

satyjit ray

पाथेर पांचाली, चारुलता, तीन कन्या, सोनार केल्ला तसेच अपु मालिकेतील तीन चित्रपट अशा अनेक अविस्मरणीय चित्रपटांमुळे सत्यजित रे यांनी चित्रपट रसिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे, “अ रे ऑफ जीनीयस” या लघुपटाचे प्रसारण ही सांस्कृतिक मंत्रालयाच्या वस्तुसंग्रहालय आणि सांस्कृतिक स्थळ जतन विभागाने सत्यजित रे यांच्या दिग्दर्शक, लेखक आणि चित्रकार म्हणून अष्टपैलू व्यक्तिमत्वाला वाहिलेली आदरांजली आहे असे सिंग यांनी सांगितले. या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबतच सत्यजित रे यांच्या जन्म शताब्दी वर्ष सोहोळ्याला आज सुरुवात झाली असे सिंग यांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here