एअरटेलवर आता झी 5 फ्री

मुंबई :
एअरटेल ग्राहकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. ४ मे पासून पुढचा काही काळ एअरटेल थँक्स चे वापरकर्ते झी५ या OTT प्लॅटफॉर्म ची प्रीमियम सेवा विनामूल्य उपभोगू शकतील. भारतातील महत्वाचा OTT प्लॅटफॉर्म असणारा झी५ आणि एअरटेल भारतीय ग्राहकांना सर्वोत्तम व्हिडिओ कंटेंट देण्याच्या मनसुब्याने ही हातमिळवणी करत आहेत.
ही विशेष सेवा एअरटेल थँक्स च्या वापरकर्त्यांसाठी मे ४ पासून जुलै १२ या काळात उपलब्ध असेल. एअरटेल थँक्सचे वापरकर्ते कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त किंवा सदस्यता शुल्क दिल्याशिवाय झी५ च्या एकूण लायब्ररी मधील सर्व कंटेंट बघू शकतील.

अनुष्का घेऊन येतेय ‘पाताळ लोक’

या सह्योगामुळे झी५ भारतातील मोठा OTT प्लॅटफॉर्म म्हणून समोर येईल तसेच ग्राहकांना आम्ही एकत्रितपणे अधिक उत्तम सेवा देऊ शकू असे या विषयी बोलताना झी५ चे बिझनेस हेड मनप्रीत बुमराह यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे एअरटेल हे भारतातील सगळ्यात मोठी रीवर्ड देणारी कंपनी ठरेल असे ही शाश्वत शर्मा, भारती एअरटेल चे  सीएमओ यांनी सांगितले.
एअरटेल थँक्स हा कंपनीचा फ्लागशिप कार्यक्रम असून त्याद्वारे कंपनीने वापरकर्त्यांना विशेष सेवा देत मोठं जाळं उभं करण्यात यश मिळवलेले आहे. झी५ या वर्षी OTT प्लॅटफॉर्म च्या व्यवसायातील तिसऱ्या वर्षांत प्रवेश करत आहेत. एकूणच या सहयोगामुळे दोन्ही कंपन्यांच्या भविष्यातील व्यवसायावर दूरगामी परिणाम होतील असं या क्षेत्रातील जाणकार मत व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here