अनुरागच्या ‘बांसुरी’चे पोस्टर प्रदर्शित

प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा एकदा कॅमेरा समोर आपली कला दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. शागीर्द (२०११) आणि अकिरा (२०१६ ) नंतर तो यावेळी ‘बांसुरी’ या सिनेमात अभिनय करताना चाहत्यांना दिसेल. कश्यप ने त्याच्या फर्स्ट लूक आणि सिनेमाची पोस्टर्स त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केली.

सत्यजित ‘अ रे ऑफ जीनीयस’
‘बांसुरी’ हा सिनेमा एका आई आणि मुलाच्या भावविश्वाचा भाग असून त्यातील मुलाला त्याच्या वडिलांचा शोध घ्यायचा आहे. या सिनेमात अनुराग व्यतिरिक्त रितुपर्णा सेनगुप्ता, मसूद अख्तर आणि उपेंद्र लिमये यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा दिग्दर्शक हरी विश्वनाथ यांचा दुसरा सिनेमा असून या आधी त्यांनी तमिळमध्ये ‘ रेडिओ पेत्ती ‘ हा सिनेमा केलेला आहे. या सिनेमाला २०१५ च्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्तम सिनेमा – प्रेक्षक निवड’चा पुरस्कार मिळालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here