ऋषी कपूरची शेवटची फिल्म होणार थिएटरमध्ये रिलीज

ऋषी कपूर यांच्या अचानक झालेल्या निधनानं त्यांचे चालू असलेले प्रोजेक्ट्स रखडले आहेत. पण त्यातही ‘शर्माजी नमकीन’ या सिनेमाचं बरचसं शूटिंग ऋषी कपूर यांच्यावर झालेलं होतं. आता हा सिनेमा vfxच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्णय निमार्त्यांनी घेतला आहे.
‘आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सिनेमाचं उर्वरित भाग पूर्ण करण्याचं काम मनावर घेतलं आहे. त्यासाठी आम्ही काही vfx स्टुडिओज बरोबर बोलणी करत आहोत. हे सगळं सिनेमाच्या दर्जा उत्तम ठेवत केलं जाईल.’ असं या सिनेमाचे निर्माते हनी त्रेहान यांनी स्पष्ट केले. ऋषी कपूर यांच्या चाहत्यांना त्यांची ही शेवटची फिल्म थिएटरमध्येच बघता येईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

…आणि आज ऋषी कपूर!

ऋषी कपूर यांच्या अचानक जाण्याने त्यांचे काही प्रोजेक्ट अडकलेले आहेत. अमेरिकेहून परत आल्यानंतर त्यांनी ‘शर्माजी नमकिन’चे बरेच शूटिंग संपवले होते. तसेच एन हाथवे आणि
रॉबर्ट डी निरो यांच्या ‘द इंटर्न’ या सिनेमाच्या अधिकृत रीमेकवर ही त्यांचे काम सुरू होते. सध्या तरी या प्रोजेक्टचे भविष्य अंधारात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here