‘हे’ सिनेमे होणार थेट ओटीटीवर प्रदर्शित… ?

मुंबई :
कोरोना आणि त्याच्यामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे चित्रपट वितरणाच्या पारंपरिक व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. नजीकच्या काळातही थेट चित्रपटगृहांमध्ये सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी किती वेळ जाईल याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. या वर तोडगा म्हणून अनेक चित्रपट निर्माते त्यांचे सिनेमे थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. अर्थातच आयनॉक्स आणि तशाच इतर अन्य मोठ्या व्यावसायिक चित्रपटगृह चालक संघटनांकडून या कृतीचा तीव्र निषेध होत असून निर्माते मात्र त्यांच्या निर्णयांवर ठाम आहेत.
येत्या काही काळात अमेझॉन प्राईम च्या माध्यमातून प्रेक्षकांना काही नव्या कोऱ्या सिनेमांचे फर्स्ट डे फर्स्ट शो अनुभवता येतील. अमेझॉन इंडिया चे अमित अग्रवाल यांनी ट्विट करून याबाबतची अधिकृत माहिती जाहीर केली. ‘गेल्या दोन वर्षांपासून अमेझॉन प्राईम प्रेक्षकांच्या पसंदिस उतरत असून सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या आठवड्यात प्राईम वर सिनेमा शोधणाऱ्यांची आणि पाहणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. आम्ही अजुन एक पाऊल पुढे टाकत थेट सिनेमे प्रदर्शित करण्याची सुरुवात करत आहोत ‘

फेसबुकवर चित्रपट बघा, कोविड प्रभावितांना मदत करा…

दोन हिंदी दोन कन्नडसह एकूण सात सिनेमे येत्या काळात अमेझॉन प्राईमच्या माध्यमातून प्रदर्शित होतील. त्यात अमिताभ – आयुष्यमान स्टारर ‘गुलाबो सिताबो’ आणि विद्या बालनची बहुचर्चित फिल्म ‘शकुंतला’ यांचा समावेश असेल. दक्षिणेतून तमिळमध्ये ‘पोन्मंगला वढल’ हा तमिळ स्टार सूर्या निर्मित आणि त्याची पत्नी ज्योतीला अभिनित सिनेमासुद्धा या माध्यमातून प्रदर्शित होईल. याशिवाय कीर्ती सुरेश चां ‘पेंग्विन’ , अदिती राव हैदरीचा ‘सुफियम सुजाथम’ आणि कन्नड मधली ‘फ्रेंच बिर्याणी’ आणि ‘लॉ’ असे एकूण सात चित्रपट प्रदर्शित होतील.
अपेक्षेप्रमाणे निर्मात्यांच्या या निर्णयाला चित्रपटगृह चित्रपटगृह व्यावसायिकांनी मोठा विरोध केला आहे. सूर्या आणि ज्योतीका यांच्या सिनेमाबाबत त्यांच्यावर आजीवन सिनेमा प्रदर्शनावर बंदी घालण्याबाबतची घोषणाही केलेली आहे. पण निर्माते त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे कळते.
या शिवाय नवाझुद्दीन सिद्दीकी चा ‘घुमकेतू’ सुद्धा ‘झी५’ च्या माध्यमातून प्रदर्शित होत आहे. याशिवाय रणवीर सिंग स्टारर बिग प्रोजेक्ट ‘ ८३ ‘ आणि अमिताभ – नागराज मंजुळे यांचा ‘ झुंड ‘ हे सुद्धा सिनेमा प्रदर्शनासाठी हाच मार्ग वापरातील अशी चर्चा सिने वर्तुळात रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here