OTT विरोधात एकवटले थिएटर चालक

कोविड प्रकरणामुळे चित्रपटगृह नजिकचा काळात उघडण्याची शक्यता धूसर आहे. पण निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांच प्रदर्शन मात्र थांबवले ले नाही. त्यांनी OTT प्लॅटफॉर्म चा उपयोग करून घेत थेट सिनेमे प्रदर्शित करण्याचा मार्ग अवलंबला आहे. सध्या लॉक डाऊन च्या काळात हा मार्ग बरोबर असला तरी भविष्यात याचे दूरगामी परिणाम चित्रपट वितरण व्यवसायावर होतील. यामुळेच या नवीन वितरण पद्धती विरुद्ध जवळपास सगळेच चित्रपटगृह व्यावसायिक एकत्र येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर ईस्टर्न इंडिया मोशन पिक्चर्स च्या काही सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात एकूण व्यावसायिक परिस्थितीचा दाखला देत मोदींनी चित्रपट निर्मात्यांना ओटीटी माध्यमातून चित्रपट प्रदर्शित करायला थांबवण्याची मागणी देखील केली आहे.

‘हे’ सिनेमे होणार थेट ओटीटीवर प्रदर्शित… ?


सूत्रांनुसार अनेक बंगाली आणि इतर भाषिक निर्माते त्यांचे चित्रपट OTT वर प्रदर्शित करत आहेत. म्हणूनच या सदस्यांनी मोदींना पत्र लिहिल्याचे कळते. या सगळ्यामुळे सरकार त्यांच्या महसूल सुद्धा घालवत आहे असेही त्या पत्रात म्हटले आहे.
रतन शाह, चेअरमन EIMPA यांनी संबंधित पत्राबद्दल प्रतिक्रिया देताना, ‘ OTT वर प्रदर्शित झालेले सिनेमे पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याची शक्यता उरत नाही. एकट्या बंगालात २२५ थेटर असून त्यांच्या सगळ्या कामगारांवर गडा येईल अशी ही कृती आहे. आम्ही लवकरच यावर इतर राज्यातली संस्थांशी बोलणी करणार आहोत ‘ असे स्पष्ट केले.
या आधी EIMPA शिवाय मल्टिप्लेक्स असोशिएशन ऑफ इंडिया यांनी सुद्धा अशी मागणी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here