मिथुनचा दुसरा मुलगा ‘बॅड बॉय’?

bad boy

मिथुन चक्रवर्ती यांचा एक मुलगा मिमोह यांनी काही चित्रपटांमधून अभिनय करून बॉलिवूड मध्ये बस्तान बसवण्याचा केलेला प्रयत्न वाया जाऊन बराच वेळ झालेला आहे. परंतु घराण्याचा पावलावर पाऊल टाकत चक्रवर्ती घरातला धाकटा मुलगा नमांशी बॉलीवुड मध्ये प्रवेश करण्यास तयार आहे. जयांतीलाल गाडा यांच्या पेन प्रॉडक्शन्सच्या निर्मिती खाली तयार केल्या जाणाऱ्या ‘बॅड बॉय’ या सिनेमातून नमांशी बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश करेल. तसेच या सिनेमाचे निर्माते साजिद कुरेशी यांनी कन्या अम्रिन हिचा सुद्धा हा पहिला सिनेमा असेल. आज या सिनेमाचं पहिलं पोस्टर सुपरस्टार सलमान खानच्या हस्ते ऑनलाईन जाहीर करण्यात आलं.
bad boy
हा सिनेमा राजकुमार संतोषी दिग्दर्शित करणार असून बऱ्याच काळात त्यांनी कुठलाही हिट सिनेमा दिलेला नाही. या सिनेमाचं संगीत हिमेश रेशमिया करणार असल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here