अभिनेते धुमाळ काका यांचे निधन

फँड्री, ख्वाडा, सैराट, म्होरक्या यांसह जवळपास १०० चित्रपटांत भूमिका साकारणारे अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं निधन झालं. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होती. चित्रपटांसोबत त्यांनी वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या होत्या. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.

अनेक मराठी, हिंदी चित्रपट, वेब सीरिज व लघुपटांमधून त्यांनी दमदार अभिनयाची छाप सोडली. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये त्यांनी गणेश गायतोंडेच्या (नवाजुद्दीन सिद्दिकी) वडिलांची भूमिका साकारली होती. रामचंद्र धुमाळ यांना वयाच्या उत्तरार्धात चित्रपटांतील भूमिका मिळाल्या. पण त्या भूमिकांतून त्यांनी स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.त्यांनी काम केलेल्या जवळपास प्रत्येक चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालेले आहे. त्यामुळे धुमाळ काका ज्या चित्रपटात असतील त्याला राष्ट्रीय पारितोषिक नक्की असा गमतीने म्हटलं जाई. त्यांनी काम केलेल्या चित्रपटांपैकी म्होरक्या, ख्वाडा हे चित्रपट विशेष नावाजले गेलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here