आणि आता मराठी ‘रामायण’

रामानंद सागर कृत ‘रामायण’ या मालिकेने आजपर्यंत अनेक विक्रम केलेले आहेत. १९८७ साली पहिल्यांदा प्रदर्शित झालेल्या या मालिकेने लॉकडाऊन काळात परत प्रदर्शित होऊन ही सगळ्यात जास्त पहिली गेलेली मालिका असा विक्रम रचला आहे. या मालिकेच्या मराठी भाषिक चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. येत्या २५ मे पासून ही मालिका स्टार प्रवाह या वहिनी वरून मराठी मधून पुनः प्रदर्शित केली जाईल.
विशेष म्हणजे ही बातमी आल्यापासुन या मालिकेचं मराठी डबिंग कधी झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे. रामानंद सागर यांनी १९८७ मध्येच मूळ मालिकेचे डबिंग करत असताना मराठी डबिंग करून ठेवले होते. त्यामुळे आता रसिक ही मालिका मराठी मधून ही बघू शकणार आहेत.
रामानंद सागर यांची ही मालिका भारतात फक्त मालिका म्हणून गणली जात नसून त्याकडे भावना आणि श्रद्धा म्हणून बघण्याची संख्या जास्त आहे. एकूणच पुन्हा एकदा प्रदर्शित झाल्यानंतर मालिका आता नवीन काय विक्रम करते हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here