‘लायन्सगेट प्ले’वर आता सुपरहिट हॉलिवूड सिनेमे

मुंबई :
लायन्सगेटने आपल्या ‘लायन्सगेट प्ले’साठी पीव्हीआर पिक्चर्सकडून बॉक्सऑफिसवर यशस्वी झालेल्या लोकप्रिय हॉलिवूड चित्रपटांचे स्ट्रीमिंग हक्क विकत घेतले आहेत. भारतीय ग्राहकांपर्यंत हॉलीवूडमधील सर्वोत्तम कंटेंट पोचवण्यासाठी लायन्सगेट प्ले सतत प्रत्यनशील असून, त्यांच्याकडील सकस चित्रपटांच्या यादीत भर घालत असतात.
लायन्सगेटकडे ॲक्शन-थरार पासून विनोदी आणि नाट्यमय अशा अनेकविध शैलींतील आणि समीक्षकांची तसेच व्यावसायिक प्रशंसा मिळवलेले हॉलीवूड चित्रपट असून त्यांना भारतीय ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांच्या चित्रपट संग्रहात जगभरातील बॉक्सऑफिसवर यशस्वी ठरवलेले विविध चित्रपट असून, यामध्ये ब्रॅड पिट अभिनित ‘फ्यूरी’, अरनॉल्ड श्वाझ्नेगर-सॅल्वेस्टर स्टॅलन अभिनित ‘दि टॉम्ब अका एस्केप प्लॅन’, वेन डिझेल-कार्ल अर्बन अभिनित ‘रीडीक’ यांचा प्रमुख समावेश आहे. हे चित्रपट २०२० मध्ये लायन्सगेटवर प्रदर्शित होणार आहेत. जूनमध्ये लायन्सगेट प्ले त्यांच्या ‘फ्रायडे ब्लॉकबस्टर’ मालिकेत सलमा हायेक-पेनेलोप क्रूझ अभिनित वेस्टर्न ॲक्शन कॉमेडी ‘बँडिडस’ आणि जेट लीचा ‘किस ऑफ दि ड्रॅगन’ प्रदर्शित होणार आहे. नजीकच्या काळात ओटीटी प्लेयर यांतील काही चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इतर भाषांमध्ये डब करणार आहेत.
‘मी का मास्क वापरू?’

बदलता काळ आणि जागतिक महामारीमुळे देश लॉकडाऊनमध्ये असल्याने कंटेंटची मागणी वाढतच चालली आहे. पीव्हीआरसोबतच्या भागीदारीसारखे अनेक करार लायन्सगेटकडून भविष्यात जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here