भारतबाला म्हणताहेत ‘उठेंगे हम’

मुंबई :
‘या देशातले एकशे तीस कोटी लोक एक दिवस अचानक दाराआड कोंडले गेले, हि त्या लोकांची आणि स्तब्ध होऊन गेलेल्या सुन्न देशाची कहाणी आहे. पण यातूनही हा देश बाहेर पडेल… हा देश नव्हे, तुम्ही -आम्ही आपण सगळे एकमेकांच्या मदतीने यातून बाहेर पडू. ‘उठेंगे हम ‘ या शीर्षकाची भारतबाला प्रॉडक्शनची नवी चित्रफित रिलीज झाली आहे . भारतबाला म्हटले की उत्कृष्ट निसर्गदृश्ये, मान्यवरांचा सहभाग आणि सुमधूर संगीताने सजलेल्या भारतीयांच्या समरणात सदैव  रेंगाळणा-या ‘ मिले सूर मेरा तुम्हारा’ सारख्या आठवणी पण  ‘उठेंगे हम ‘ आहे मुख्य देशाची अस्वस्थ दृश्य-कहाणी.

मै चाहता हूं , की जो हुआ, हम कभी ना भुले’ या चिवट ध्यासातून भारतबाला यांनी कोरोनाशी युद्ध ऐन भरात आलेले असताना देशभरात ड्रोन चित्रीकरणासाठी परवानगी मिळवण्याचे दिव्यअंगावर घेतले आणि काही चांगल्या ​​अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पारही पाडले. त्यांचा शूटिंग क्रू देशात वेगवेगळे या ठिकाणी आपापले काम करत होता, भारतबाला मुंबईत स्मार्टफोनवरून दिग्दर्शन करत होता . अखेर हाती जमलेल्या शंभराहून अधिक तासांच्या चित्रीकरणातले काही क्षण निवडून’उठेंगे हम ‘ आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ही चित्रफित अनेक भारतीय भाषांमध्ये डब करण्यात आली असून यामध्ये मराठी आवृत्तीपण आहे. यासाठी सोनाली कुलकर्णी हिने आपला आवाज दिला आहे.


कोरोनाने आपल्या अर्थव्यवस्थेची आणि मानसिक स्वास्थाची जी काही दैना उडवली आहे, त्यातून आपण सगळे बाहेर पडू आणि एकमेकांना हात देऊन बाहेर पडू; अशी भारतबाला यांना वाटते. ‘ अभी देश मे दर्द बहोत है लेकिन दर्दसेही होसला बढता है, जीम्मेदारी आती है.
https://www.youtube.com/watch?v=u6ppmW7bfVo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here