अमॅझॉन प्राईम बघा आता जिओवर…

मुंबई :
अॅमेझॉनने जिओफायबर सबस्‍क्रायबर्सना त्‍यांच्‍या सेट-टॉप बॉक्‍सवर अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ अॅपवरील प्रिमिअम कन्‍टेन्‍ट पाहण्‍याची सुविधा देण्‍याकरिता आज भारतातील सर्वात मोठी व झपाट्याने विकसित होत असलेली डिजिटल सेवा कंपनी जिओसोबत सहयोगाची घोषणा केली. याव्‍यतिरिक्‍त जिओ गोल्‍ड व त्‍यावरील ब्रॉडबॅण्‍ड प्‍लान्‍सवरील जिओफायबर ग्राहकांना विना अतिरिक्‍त मूल्‍यामध्‍ये वार्षिक ९९९ रूपयांचे एक वर्षाचे प्राइम सदस्‍यत्‍व ऑफर करणार आहे. या डिलच्‍या माध्‍यमातून जिओफायबर ग्राहकांना आता त्‍यांच्‍या टीव्‍हीवर अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ अॅप उपलब्‍ध होऊ शकतो. ज्‍यामुळे ते अॅमेझॉनचे नवीन व खास ब्‍लॉकबस्‍टर हॉलिवुड, बॉलिवुड व भारतीय प्रादेशिक चित्रपट, सर्वोत्तम टीव्‍ही मालिका, स्‍टॅण्‍ड-अप विनोदी मालिका, लहान मुलांचे कार्यक्रम, तसेच समीक्षकांनी प्रशंसित केलेले भारतीय व जागतिक अॅमेझॉन ओरिजिनल्‍स पाहण्‍याचा आनंद घेऊ शकतील.
गोल्‍ड प्‍लान्‍स व त्‍यावरील प्‍लान्‍समधील जिओफायबर ग्राहक त्‍यांच्‍या अॅमेझॉन खात्‍यामध्‍ये साइन इन करत किंवा त्‍यांच्‍या जिओ सेट-टॉप बॉक्‍सच्‍या माध्‍यमातून नवीन अॅमेझॉन खाते बनवत आणि मायजिओ अॅप किंवा Jio.com वर लॉग इन करत त्‍यांचे वार्षिक अॅमेझॉन प्राइम सदस्‍यत्‍व सुरू करू शकतात. पात्र नसलेले ग्राहक या ऑफरचा लाभ घेण्‍यासाठी जिओफायबर गोल्‍ड व त्‍यावरील प्‍लान रिचार्ज करू शकतात. विद्यमान अॅमेझॉन प्राइम सदस्‍य थेट त्यांच्‍या जिओ सेट-टॉप-बॉक्‍सवरील अॅमेझॉन प्राइम व्हिडिओमध्‍ये साइन-इन करू शकतात आणि प्राइम व्हिडिओचा व्‍यापक कन्‍टेन्‍ट पाहण्‍यास सुरू करू शकतात. यामध्‍ये समीक्षकांद्वारे प्रशंसित भारतीय अॅमेझॉन ओरिजिनल्‍स जसे ‘पाताल लोक’, ‘फोर मोअर शॉट्स प्‍लीज! ‘, ‘दि फॅमिली मॅन’, ‘मिर्झापूर’ आणि लोकप्रिय जागतिक ओरिजिनल्‍स जसे ‘जॅक रायन’, ‘मार्वलस मिसेस मैसेल’, ‘दि बॉईज’ यांचा समावेश आहे.

भारतबाला म्हणताहेत ‘उठेंगे हम’

”आम्‍हाला जिओफायबर ग्राहकांना अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ उपलब्‍ध करून देण्‍यासाठी जिओसोबत काम करण्‍याचा आनंद होत आहे,” असे अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ इंडियाचे संचालक व देशातील महा-व्‍यवस्‍थापक गौरव गांधी म्‍हणाले. ”अॅमेझॉनमध्‍ये आमचा ग्राहकांना कधीही, कुठेही आणि त्‍यांच्‍या आवडीच्‍या स्क्रिनवर विविध शैली व भाषांमधील दर्जात्‍मक मनोरंजन पाहण्‍याची सुविधा देण्‍याचा सातत्‍याने प्रयत्‍न राहिला आहे. या सादरीकरणासह आम्‍ही भारतातील अॅमेझॉन प्राइम व्हिडिओची पोहोच व उपलब्‍धता अधिक वाढवू. ज्‍यामुळे अधिकाधिक ग्राहकांना लोकप्रिय अॅमेझॉन ओरिजिनल्‍स, विविध भाषांमधील ब्‍लॉकबस्‍टर चित्रपट आणि भारतीय व आंतरराष्‍ट्रीय मालिकांची व्‍यापक रेंज त्‍यांच्‍या टेलिव्हिजन सेट्वर पाहता येईल.”
”अॅमेझॉन प्राइम व्हिडिओसोबतचा आमचा सहयोग जिओफायबर ग्राहकांना मनोरंजनाचा अद्वितीय अनुभव देतो. जिओ आपल्‍या ग्राहकांना संपन्‍न अनुभव देण्‍याचा प्रयत्‍न करते आणि हा सहयोग जिओफायबर युजर्सना विना अतिरिक्‍त मूल्‍यामध्‍ये एक वर्षासाठी अॅमेझॉन प्राइम सदस्‍यत्‍वाचा लाभ देईल,” असे जिओचे धोरण प्रमुख अंशुमन ठाकूर एका निवेदनामध्‍ये म्‍हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here