प्रसिद्ध लेखक – दिग्दर्शक साची यांचे निधन

कोची :

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक के. आर. सचिदानंदन उर्फ साची यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. साची ४८ वर्षांचे होते.
याच वर्षी साची यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अय्यपम कोशियाम’ या सिनेमाचे प्रेक्षक आणि समीक्षक असे दोघांनीही कौतुक केले होते.

मुळात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या साची यांनी सिनेमामध्ये करीअर करण्यासाठी शिक्षण सोडले आणि सेथूसोबत लेखक म्हणून काम सुरू केले. २००७ साली आलेला ‘चॉकलेट ‘ हा त्यांचा सहलेखक म्हणून पहिला सिनेमा होता. त्यांनी सेथु सोबत २०१० पर्यंत जवळपास ५ सिनेमांसाठी काम केले. २०१० साली ही जोडी फुटल्यावर मोहनलाल चा ‘रन बेबी रन ‘ हा त्यांचा स्वतंत्र लेखक म्हणून पहिला सिनेमा होता. २०१५ साली दिग्दर्शनात पाऊल टाकले. पृथ्वीराज सुकुमारन आणि प्रियल गोर सोबतचा ‘अनारकली’ हा त्यांचा पदार्पण सिनेमा होता.

साची गेल्या काही दिवसांपासून त्रिसूर इथल्या ज्युबिली हिल्स हॉस्पिटल मध्ये हृदयविकारावर उपचार घेत होते. गुरुवारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

निवीन पॉली, पृथ्वीराज सुकुमारन , विष्णु विशाल तसेच दिग्दर्शक थिरू सारख्या अनेक मान्यवरांनी सोशल माध्यमांवर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here