उद्या ‘इथे’ बघा ‘बाप’ चित्रपट

मुंबई :
रविवार, २१ रोजी साजऱ्या होणार्‍या फादर्स डेच्या निमित्ताने लायन्सगेट प्ले ही स्ट्रीमिंग सर्विस “#RADDAD” ही नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन आली आहे. याअंतर्गत समीक्षकांनी गौरविलेले आणि व्यावसायिक यश मिळालेले काही चित्रपट या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. लायन्सगेट प्लेने यासाठी काही नावीन्यपूर्ण आणि मजेशीर उपक्रम बनवले असून त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते येत्या आठवड्यात अपलोड होतील. तसेच त्यांच्या फॉलोवर्ससाठी काही आकर्षक स्पर्धादेखील घेण्यात येतील. यात लोकांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेले काही मजेशीर सल्ले सांगायला करायला सांगितले जाईल आणि पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक गिफ्ट व्हाऊचर्स दिली जातील.
डिस्ने + हॉटस्टार इंडियाच्या प्रमुखपदी सुनील रायन

मुलांसाठी वडील त्यांचे सुपरहिरो असतात आणि मुलांच्या गरजेनुसार ते त्यांची भूमिका बदलत असतात. क्षणार्धात ते कडक शिस्त सोडून मुलांचे विश्वासू मित्र बनू शकतात. हाच धागा पकडून लायन्सगेट प्लेवर अ बेटर लाइफ, निम्स आयलंड, फरी वेन्जिन्स, डॅडीज लिटिल गर्ल्स आणि ब्लाईंड स्पॉटिंग हे चित्रपट दाखवले जातील जेणेकरून सिनेरसिकांना आपल्या वडिलांसोबत फादर्स डेला त्यांचा आनंद लुटता येईल. वोडाफोन प्ले, आयडिया मूवीज & टीवी आणि एअरटेल एक्स्ट्रीम या लायन्सगेट प्लेच्या पार्टनर अॅप्सवर हे सर्व चित्रपट उपलब्ध होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here