डिस्ने + हॉटस्टार इंडियाच्या प्रमुखपदी सुनील रायन

मुंबई :
देशातील सर्वाधिक विस्तारलेल्या ओटीटीच्या, डिस्ने + हॉटस्टार इंडियाच्या प्रमुखपदी सुनील रायन यांची आज नियुक्ती करण्यात आली. सुनील यांना उत्पादन अभियांत्रिकी आणि व्यावसायिक क्षेत्राचा 20 वर्षांचा अनुभव असून, गेल्या 8 वर्षांपासून गुगलमध्ये (माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया) कार्यरत होते व अखेरीस त्यांनी क्लाउड फॉर गेम्स विभागाचे व्यवस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले आहे.
अमॅझॉन प्राईम बघा आता जिओवर…

‘सुनील हे अतिशय गुणवत्तापूर्ण असून त्यांनी जागतिक स्तरावर उत्तम कामगिरी केली आहे. डिस्ने + हॉटस्टारच्या कुशल टीमचे नेतृत्व करण्यासाठी सुनील यांची झालेली निवड उत्साहीत करणारी आहे. डिस्ने + हॉटस्टार इंडियामध्ये आम्ही खास तयार केलेल्या कार्यक्रमांसाठी (क्युरेटेड कंटेंट) देशातील सर्वात मोठे व अत्याधुनिक व्यासपीठ तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे आणि ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सुनील सर्वात योग्य व्यक्ती असल्याचे स्टार आणि डिस्ने इंडिया तसेच वॉल्ट डिस्ने कंपनी आशिया पॅसिफिकचे अध्यक्ष उदय शंकर यांनी माध्यमांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here