अमी त्रिवेदी साकारणार रिषभची आई

वडिल-मुलाच्‍या नात्‍यावर आधारित ‘तेरा यार हूं मैं’ हि मालिका सोनी सबवर सुरु होत आहे. या मालिकेची कथा जयपूरमधील बन्सल वडिल-मुलाची जोडी राजीव व रिषभच्‍या अवतीभोवती फिरते. आजच्‍या युगाशी जुळवून घेण्‍यासाठी राजीवची वास्‍तविकत: तसेच सोशल मीडियावर रिषभचा मित्र बनण्‍याची इच्‍छा आहे. वडिल व मुलामधील नाते पिढ्यानपिढ्या कशाप्रकारे सर्वसमावेशक होत जाते या बाबीला मालिका सादर करते आणि त्‍यांच्‍या जीवनातील कडू-गोड नात्‍याला दाखवते.

उद्या ‘इथे’ बघा ‘बाप’ चित्रपट

या मालिकेत अमी त्रिवेदीला रिषभची आई जान्‍हवी बन्सलची भूमिका साकारण्‍यासाठी निवडण्‍यात आले आहे. मालिकेमधील या भूमिकेबाबत बोलताना अमी त्रिवेदी म्‍हणाली, ”सोनी सबवर पुनरागमन केल्‍याने चांगले वाटत आहे. मला आनंद होत आहे की, मला सोनी सबवरील आगामी मालिका तेरा यार हूँ मैंचा भाग बनण्‍याची संधी मिळाली आहे. मी चॅनेलवरील मालिकांचा भाग असण्‍याचा आनंद घेते. कारण मालिका हलक्‍या-फुलक्‍या विनोदांवर भर देतात, जी माझी आवडती शैली आहे. मला आनंद व हास्‍य पसरवायला आवडते. एक कलाकार म्‍हणून प्रेक्षक घरामध्‍येच असताना त्‍यांना हसवण्‍याची संधी मिळण्‍याचे भाग्‍य आहे. मी टीमसोबत एकजुटीने काम करण्‍यास आणि मालिकेची शूटिंग पुन्‍हा सुरू करण्‍यास उत्‍सुक आहे. तसेच मी ही भूमिका साकारण्‍यासाठी देखील उत्‍सुक आहे. मी सामान्‍यत: गुजराती भूमिका साकारल्‍या असल्‍यामुळे ही भूमिका अत्‍यंत रोचक व यावेळी काहिशी आव्‍हानात्‍मक असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here