अभिषेकचा ‘ब्रिद’ १० जुलैपासून

मुंबई :
अॅमेझॉन ची बहुप्रतीक्षित ओरिजिनल सिरीज ‘ब्रीद’चा बहुप्रतिक्षित नवीन चॅप्‍टर १० जुलै रोजी रिलीज होणार आहे. सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर ‘ब्रीद: इन्‍टू दि शॅडोज’ची निर्मिती एबंडंशिया एंटरटेन्‍मेंटने केली आहे आणि या सिरीजच्‍या माध्‍यमातून सुपरस्‍टार अभिषेक बच्‍चन छोट्या पडद्यावर डिजिटल पदार्पण करत आहे.
या सिरीजमध्‍ये बहुप्रशंसित अभिनेता अमित साध सीनियर इन्‍स्‍पेक्‍टर कबीर सावंतच्‍या भूमिकेत दिसणार आहे. या ओरिजिनल सिरीजमध्‍ये दक्षिण भारतातील आघाडीची  अभिनेत्री नित्‍या मेनेन हिंदी वेबसिरीजमध्ये  पदार्पण करत आहे. सयामी खेर देखील या सिरीजमध्‍ये प्रमुख भूमिकेत आहे.

शूटिंग सुरु झाल्याने गुल्‍की आनंदली…


”आम्‍हाला प्राइम सदस्‍यांसाठी ब्रीदची नवीन सिरीज सादर करण्‍याचा आनंद होत आहे,” असे दिग्‍दर्शक मयंक शर्मा म्‍हणाले. “सिरीजमधील प्रत्‍येक पात्राची स्‍वत:ची कथा आहे. या कथा एकमेकांमध्‍ये कशाप्रकारे गुंतल्‍या जातात, हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नवीन चॅप्‍टरसह मी प्राइम सदस्‍यांना भावना व रोमांचच्‍या नवीन रोलर-कास्‍टर प्रवासावर घेऊन जाण्‍यास उत्‍सुक आहे. हा प्रवास निश्चितच त्‍यांच्‍यासाठी रोमांचकारी ठरणार आहे.” 
एबंडंशिया एंटरटेन्‍मेंटने या सिरीजची निर्मिती केली असून मयंक शर्माने दिग्‍दर्शन केले आहे. भवानी अय्यर, विक्रम तुली, अर्शद सय्यद आणि मयंक शर्मा यांनी या सिरीजचे लेखन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here