शूटिंग सुरु झाल्याने गुल्‍की आनंदली…

सोनी सबने यंदाच्‍या वर्षाच्‍या सुरूवातीला सादर करण्‍यात आलेली हलकी-फुलकी मालिका मॅडम सरसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कुछ बात है क्‍यूंकी जजबात है या टॅगलाइनसह मॅडम सर मालिका चार डायनॅमिक महिला पोलिस अधिका-यांच्‍या दृष्टिकोनांमधून सामाजिक समस्‍यांचे निराकरण करते. या चारही महिला पोलिस अधिकारी त्‍यांच्‍याकडे येणा-या प्रत्‍येक आव्‍हानाला स्‍वीकारतात आणि केसेसचे निराकरण करतात.
मालिका प्रतिभावान कलाकार आणि प्रेक्षकांना रोमांचक प्रवासावर घेऊन जाणा-या कथानकाच्‍या अद्वितीय संयोजनासह प्रेक्षकांना अचंबित करते. यंदाच्‍या वर्षाच्‍या सुरूवातीला सादर करण्‍यात आलेल्‍या मालिकेमधील कलाकार गुल्‍की जोशी (हसीना मल्लिक), युक्‍ती कपूर (करिष्‍मा सिंग), भाविका शर्मा (संतोष शर्मा) आणि सोनाली नाईक (पुष्‍पा सिंग) यांना लॉकडाऊन कालावधीदरम्‍यान एकमेकांची आणि मॅडम सरच्‍या सेटची खूप आठवण येत होती.

‘त्याचे सिनेमे पाहा, मग आपण बोलू’

पण, सर्व खबरदारीचे उपाय घेत आत्ता पुन्‍हा शूटिंगला सुरूवात झाली आहे. मालिकेचे कलाकार सेटवर पुन्‍हा परतल्‍याने आणि त्‍यांना आवडणारी गोष्‍ट म्‍हणजे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍यासाठी आनंदित झाले आहेत. जवळपास ३ महिन्‍यांच्‍या अंतरानंतर पहिल्‍यांदाच ‘मॅडम सर’च्‍या सेटवर परतल्‍याने अनेक बदल पाहायला मिळाले. सर्व कलाकार व टीम एकमेकांच्‍या आरोग्‍याच्‍या खात्रीसाठी प्रत्‍येक सुरक्षितता उपाय घेत आहेत.
याबाबत बोलताना हसीना मल्लिकची भूमिका साकारणारी गुल्‍की जोशी म्‍हणाली, ”सेटवर परतल्‍याने खूपच आनंद झाला आहे. सेटवर मोजकेच लोक आहेत, पण घरी परतल्‍यासारखे वाटत आहे. सोनी सब व प्रॉडक्‍शन हाऊसने सेटवरील प्रत्‍येकाच्‍या आरोग्याच्‍या खात्रीसाठी विविध सुरक्षितता उपाय योजले आहेत. योग्‍य स्‍वच्‍छता व सुरक्षितता गिअरशिवाय कोणालाच सेटवर प्रवेश करू दिला जात नाही. आम्‍ही सर्वजण प्रत्‍येकवेळी योग्‍य अंतर राखतो. हे काहीसे वेगळे वाटत असले तरी आम्‍हाला आमची व संपूर्ण टीमच्‍या सुरक्षिततेसाठी घेतल्या जाणा-या या उपायांचे महत्त्व समजते. मी आशा करते की, सर्वकाही लवकर सुरळीत होईल. आम्‍ही लवकरच आमच्‍या प्रेक्षकांसाठी नवीन एपिसोड्स घेऊन येण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here