ज्योतीची ‘आत्मनिर्भर’ कथा रुपेरी पडद्यावर

देशभरात लॉकडाउन जाहीर  केल्यानंतर आपल्या वडिलांना सायकलच्या मागच्या सीटवर बसवून हरियाणातील गुडगावपासून बिहारपर्यंत १२०० किमीचा प्रवास करणारी ज्योती कुमारी चांगलीच चर्चेत आली होती. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये ज्योतीची कहाणी समजल्यानंतर सर्व स्तरातून तिचं कौतुक झालं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीनेही ज्योतीचं कौतुक केलं. ज्योतीच्या याच संघर्षाची कथा आता ‘आत्मनिर्भर’  आणि ‘अ जर्नी ऑफ अ मायग्रंट’ या नावाने रुपेरी पडद्यावर येणार आहे.
‘वी मेक्स फिल्म्स’ या सिनेनिर्मात्या कंपनीने ज्योतीच्या या संघर्षमय कहाणीचे हक्क विकत घेतले असून ऑगस्ट महिन्यापासून चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. यामध्ये ज्योतीदेखील भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ज्योतीच्या कहाणीसोबतच लॉकडाउन काळात तिला वडिलांसोबत सायकलने प्रवास का करावा लागला?? या प्रश्नाचाही वेध घेतला जाणार असल्याचं कळतंय.  माझ्या प्रवासावर सिनेमा होतोय, हि खूप आनंददायी बाब असल्याचे ज्योतीने माध्यमांना सांगितले. 

शूटिंग सुरु झाल्याने गुल्‍की आनंदली…

गुडगाव ते दरभंगा या मार्गावर या सिनेमाचं चित्रीकरण होणार असून, या प्रवासादरम्यान तिला काय-काय अनभव आले हे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक शाईन क्रिष्णा यांनी सांगितलं. हिंदी, इंग्रजी आणि मैथिली भाषेत बनवली जाणार असून अन्य भाषांमध्येही या चित्रपटाचं डबिंग केलं जाणार आहे. या चित्रपटात ज्योतीच्या वडिलांची भूमिका कोण करेल हे अद्याप निश्चीत झालेलं नसल्याचं दिग्दर्शकांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here