…आणि आता व्हा ‘हिपी’

मुंबई :
टिकटॉकवर देशात बंदी आल्यामुळे आता विविध देशी अ‍ॅप बाजारात येत आहेत. यामध्ये झी टीव्हीने आघाडी घेतली असून ‘झी५’ने ‘हिपी’ हे  शॉर्ट व्हिडीओ आज प्रकाशित केले. 
‘झी५’ने आज बहुप्रतिक्षित आणि भारतातील पहिल्याच लघु व्हिडिओपटांसाठीच्या प्लॅटफॉर्मची घोषणा केली. खास भारतीय बनावटीचे असे ‘हिपी’ हे नाविन्यपूर्ण आणि रोमांचक व्यासपीठ ‘झी५’ने सादर केले आहे. यातील अत्याधुनिक वैशिष्ट्यांच्या मदतीने सर्वात कल्पक आणि रोमांचक अशी सामग्री या ठिकाणी कोणालाही तयार करता येईल.
उत्साही, जल्लोषपूर्ण वातावरणाची प्रचिती देणारे ’हिपी’ हे नाव धारण करणाऱ्या या विशेष वाहिनीवर, पूर्ण स्वातंत्र्य व आत्मविश्वास यांच्या जोरावर देशातील तरुणाई व्यक्त होऊ शकेल. निर्विवादपणे व बेदरकारपणे, कोणाच्याही टिकेची पर्वा न करता मस्ती व धमाल करू देणारे हे ‘झी’ चे हिपी व्यासपीठ तरुणाईला अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देतेच, त्याशिवाय तरुणांच्या अंगी असलेल्या कला व कौशल्ये या गुणांना खतपाणी घालत त्यांना नवनिर्मितीचा आणि स्टार हेण्याची संधीही मिळवून देते. 

अभिषेकचा ‘ब्रिद’ १० जुलैपासून

सर्जनशील मनाला सर्वात सृजनात्मक मार्गाने व्यक्त करू देण्यासाठीची अनेक रोमांचक वैशिष्ट्ये ‘हिपी’ मध्ये असतील. करमणूकप्रधान अशा सर्व गोष्टींचे हे प्रमुख ठिकाण असेल, तसेच विविध गोष्टींचे चाहते व कथाकार यांच्यासाठीचे हे व्यासपीठ असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here