शेखरने सुरु केले आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय

मुंबई :
ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल आणि प्रसिद्ध संगीतकार-गायक शेखर रावजीआनी यांनी एकत्र येत जीआयआयएस-शेखर रावजीआनी स्कूल ऑफ् म्युझिक सुरू केले आहे. अत्याधुनिक सुविधा आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा वापर करत संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना पुढे आणण्यावर भर देणारा उपक्रम सुरू करण्यासाठी एक जागतिक शिक्षण संस्था आणि भारतीय संगीतकाराने एकत्र येत सुरू केलेला हा या प्रकारचा पहिलाच सहयोग आहे.
विशाल-शेखर या संगीतकार जोडीने भाग असून या जोडीने रा वन, चेन्नई एक्स्प्रेस, एक था टायगर, वॉर अशा ७० हून अधिक सिनेमांसाठी ६०० हून अधिक गीते संगीतबद्ध केली आहेत. बहुआयामी शेखर रावजीआनी या विषयातील आपले ज्ञान आणि कौशल्य तसेच संगीत क्षेत्रातील २० वर्षांपेक्षा अधिक असलेल्या अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देतील. सारेगमप, व्हॉईस किड्स, इंडियन आयडॉल अशा ख्यातनाम १५ म्युझिक रिअॅलिटी शोमध्ये त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. कायम मुलांसोबत काम करण्यावर विश्वास असलेले शेखर तरुणांसाठी आदर्श आहेत. जीआयआयएसच्या जगभरातील २१ कॅम्पसेसमध्ये या स्कूलचा अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत. 
शिक्षणाप्रती समग्र दृष्टिकोन अंगिकारत जीआयआयएस विद्यार्थ्यांमध्ये नऊ वैशिष्ट्यपूर्ण मूल्ये बिंबवून त्यांना जागतिक नागरिक बनण्यास साह्य करणार आहे. जागतिक नागरिक या संकल्पनेत परफॉर्मिंग आर्ट्सचा मोठा वाटा आहे. जगभरात या स्कूलच्या स्मार्ट कॅम्पसेसमध्ये उत्तम तंत्रज्ञान आणि अद्ययावत सुविधांचा वापर करून २१ व्या शतकाला साजेसे शिक्षण दिले जाते. शिक्षणाच्या प्रत्येक विभागात विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद घेता यावी, यासाठी यात खास म्युझिक स्टुडिओ आणि डेटा अॅनालिटिक्स तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

ज्योतीची ‘आत्मनिर्भर’ कथा रुपेरी पडद्यावर

जीआयआयएस आणि शेखर जागतिक दर्जाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. जीआयआयएसच्या जगभरातील २१ स्कूल्समधील १५००० हून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. भविष्यात जगभरातील जीआयआयएस कॅम्पसमध्ये जीआयआयएसबाह्य विद्यार्थ्यांसाठीही काही कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. 
या नव्या उपक्रमाबद्दल शेखर रावजीआनी म्हणाले, “संगीत म्हणजे फक्त एक अभिव्यक्ती नाही. जगात आनंद पसरवण्याचे ते एक माध्यम आहे. शिक्षण ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि माझे हे विचार जीआयआयएसच्या समग्र शिक्षण देणे आणि पुस्तकांपलिकडचे मूल्याधारित शिक्षण देण्यावर भर या दृष्टिकोन आणि तत्वांशी अगदी मेळ खातात. मी गेल्या काही महिन्यांपासून जपान, अबु धाबी, भारत, मलेशिया आणि सिंगापूरमधील विद्यार्थ्यांसोबत काम सुरू केले आहे. तरुण आणि उदयोन्मुख प्रतिभावान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना शिकवणे हे माझ्यासाठी ऋण फेडल्यासारखे आहे. माझ्यावर, माझ्या आजवरच्या वाटचालीवर ज्यांनी विश्वास टाकला, त्यांचे आभार मानण्याचा हा एक मार्ग आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here