‘ऑल्टबालाजी’साठी या ‘पे पॉईंट’वर

मुंबई :
सध्याचा लॉकडाऊन आणि त्यामुळेच्या ऑनलाईन जगामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मला सुगीचे दिवस आले आहेत. अशावेळी विविध ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या पद्धतीने स्वत:मध्ये गुंतवून ठेवत आहेत. त्यातच आता ‘अल्टबालाजी’ने आपला प्रेक्षकविस्तार करण्यासाठी कंबर कसली असून ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रेक्षकांना ऑल्टबालाजीचा लाभ घेता यावा यासाठी ‘पे पॉईंट’सोबत भागीदारी केली आहे. हा अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग ओटीटीमध्ये होत आहे. 
ऑल्टबालाजीच्या चाहत्यांसाठी पेपॉईंट ऑफलाइन स्टोअरमधून अॅक्टिवेशनसाठी तसेच सबस्क्रिप्शनचे पैसे भरणे, रोख रकमेने नुतनीकरण करणे आणि घरबसल्या विविध प्रोग्राम्स मिळवणे यासंदर्भांत सहज मार्गदर्शन आणि साह्य मिळेल. पेपॉईंटचे भारतभरातील 45,000 हून अधिक तंत्रज्ञानाधारित रीटेलर्स आहेत. शिवाय, त्यांचे 80 टक्क्यांहून अधिक ग्राहक ग्रामीण आणि निमशहरी भागात असल्याने कंटेंट अधिक प्रमाणात उपलब्ध करून देत ऑल्टबालाजीला बाजारपेठांमध्ये अधिक विस्तार करता येणार आहे.
‘व्हिसलिंग’ विद्यार्थ्यांच्या शॉर्ट फिल्म्स ओटीटीवर

सध्याच्या संकट काळात ऑल्टबालाजीच्या प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, लॉकडाऊनच्या आधी मार्च 2020 मध्ये दररोज 10,600 इतके सबस्क्रिप्शन होत होते. मात्र, लॉकडाऊननंतर या काळात 60 टक्के वाढ होऊन हा आकडा 17,000 पर्यंत वाढला आहे. पेपॉईंट ही आघाडीची ऑफलाइन-टू-ऑनलाइन (ओ2ओ) कंपनी गेल्या दहा वर्षांपासून भारतभरात कार्यरत आहे. ही कंपनी आता ऑल्टबालाजीसाठी रोख रक्कम जमा करण्याची सोय रीटेल आऊटलेटमध्ये देणार आहे. 
ऑल्टबालाजीचे सीईओ आणि बालाजी टेलिफिल्म्सचे ग्रूप सीओओ नचिकेत पंतवैद्य म्हणाले, देशातील ग्रामीण आणि निमशहरी भागात आमचे अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने पेपॉईंटसोबत केलेली धोरणात्मक भागीदारी म्हणजे या दिशेने टाकलेले सुयोग्य पाऊल ठरते. ग्राहकानुभव आणि बाजारपेठेतील व्यवहारांमध्ये सुलभता आणणारा आणखी एक टचपॉईंट आम्ही देऊ शकलो, याचा आम्हाला आनंद आहे. यातून, ग्राहकांमध्ये अधिक दृढ विश्वासाची भावना निर्माण करून आमच्या ग्राहकांसोबतच बंध आम्ही अधिक घट्ट करू शकू, यावर आमचा विश्वास आहे.”
पेपॉईंट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक केतन दोषी म्हणाले, “व्हिडीओ-ऑन-डिमांड ओटीटी सेवेसाठी ऑफलाइन रीचार्ज सेवा पहिल्यांदाच उपलब्ध झाली आहे आणि हा या क्षेत्रातला पहिलाच उपक्रम आहे. या सहकार्यामुळे ऑल्टबालाजीला सबस्क्राइबर्सची संख्या वाढवणे शक्य होईल आणि भारताच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांमध्ये पेपॉईंटला एका अभूतपूर्व सेवेची भर घालता येईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here