‘मित्रों’वर दररोज दहा लाख व्हिडीओ

मुंबई :
‘टिकटॉक’वर बंदी घातल्यानंतर आता बहुचर्चित ‘मित्रों’ या नव्या शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपने गूगल स्टोअरवर २५ दशलक्ष हून अधिक डाऊलनोड्सचे यश मिळवले असून जास्तीत जास्त कंटेंट क्रिएटर्सचा ओढा हे अॅप जॉइन करण्याकडे आहे. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप असलेल्या मित्रोंवर दररोज जवळपास १० लाख नवे व्हिडिओ तयार होत असून दर तासाला ४० दशलक्ष व्हिडिओ पाहिले जात आहेत.
एप्रिल २०२० मध्ये शिवांक अग्रवाल आणि अनिश खंडेलवाल यांनी एकत्रितरित्या लाँच केलेले मित्रों हे अॅप सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरले आहे. हलक्या-फुलक्या विनोदांचा धागा पकडत लोकांनी त्यांचे नावीन्यपूर्ण व्हिडिओ ऑनलाइन टाकावेत, जेणेकरून लोकांची डिजिटल गुंतवणूक आणि मनोरंजनाची नव्याने कल्पना केली जाईल, हाच या शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपच्या स्थापनेमागील उद्देश आहे.
‘ऑल्टबालाजी’साठी या ‘पे पॉईंट’वर

मित्रोंचे संस्थापक आणि सीईओ शिवांक अग्रवाल म्हणाले, “ मित्रों प्लॅटफॉर्मवर दररोज जवळपास एक दशलक्ष नवे व्हिडिओ तयार होताना पाहून आम्हाला खूप आनंद होतो आहे. प्रत्येकजण लॉकडाउनमध्ये ज्या वेळी घरात राहण्यासाठी बांधील होता, तेव्हाच लोकांना असा डिजिटल एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा, ज्यातून लोकांनी किंवा स्वत: टाकलेल्या शॉर्ट व्हिडिओद्वारे लोकांचे मनोरंजन होईल, असा आमचा उद्देश होता.” 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here