‘लायन्सगेट’ होणार ‘जिओ’वर ‘प्ले’

मुंबई :
‘लायन्सगेट प्ले’ अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या छाट्यांसाठी आता एक नवी खुशखबर आहे. भारतामध्ये हा ओटीटी प्लॅटफॉर्म आता जिओ फायबरवर देखील पाहता येणार आहे.हॉलिवूडमधील लोकप्रिय सिनेमांसाठी लायन्सगेट प्ले हा एक चांगला पर्याय सध्या ओटीटी ग्राहकांसाठी आहे. अशावेळी भारतासह संपूर्ण दक्षिण आशियामध्ये पसरण्यासाठी कंपनीने आता जिओसोबत हातमिळवणी केली आहे. यामुळे जिओ टीव्हीच्या प्रेक्षकांनाही ‘लायन्सगेट प्ले’वरील सिनेमांचा लाभ घेता येणार आहे. 
‘शंकुतला देवी’चाही आता ‘प्राइम’शो

देशामध्ये सुरुवातीपासूनच नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, डिस्ने हॉटस्टार, झी ५, ऑल्टबालाजी आणि अन्य विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्स आपली सेवा देत आहेतच, पण त्याचसोबत विविध बहुराष्ट्रीय ओटीटी भारतासारख्या विस्तारणाऱ्या प्रेक्षकांच्या बाजारपेठेवर काबू मिळवण्यासाठी सरसावत आहेत. लॉकडाऊनचा सर्वार्थाने फायदा करून घेत या आणि इतर सर्वच ओटीटी प्लॅटफॉर्म्स  विविध माध्यमातून आपले वेगळेपण अधोरेखित करत आपले स्थान बळकट करत आहेत. ‘लायन्सगेट प्ले’ नेदेखील गाजलेले हॉलिवूड सिनेमे घेऊन येत नव्या जुन्या हॉलिवूड चाहत्यांना आपल्या बाजूने वळवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांनी आता जिओचा हात धरला आहे. जिओफायबरमुळे आता त्यांना जिओच्या देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे जाणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here