‘शंकुतला देवी’चाही आता ‘प्राइम’शो

आणि अपेक्षेप्रमाणे ’शकुंतला देवी’ हा ’मानवी संगणक’ शकुंतलादेवी यांचा बायोपिक अखेर अमेझॉन प्राइमवर आता प्रदर्शित होणार आहे. वास्तविक गेल्या पाच महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे आणि नजीकच्या भविष्यात सिनेगृह कधी सुरु होतील याची काहीच शाश्वती नसल्यामुळे विविध निर्मात्यांनी आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळवला आहे. अमेझॉन प्राइमने यामध्ये आघाडी मिळवली असून बहुतांश सिनेनिर्मात्यांनी प्राइमला आपली पसंदी दिलेली दिसते.
गेल्या दोन महिन्यात ’प्राइम’वर हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगू अशा लोकप्रिय भाषांतील उत्तमोत्तम सिनेमे प्रदर्शित झाले. यामध्ये ’गुलाबो सिताबो’, ’पेंग्विन’, ’पोन्मगल वंधल’चे जागतिक प्रिमिअर्स झाले. याच यादीत आता ‘शकुंतला देवी’ येणार आहे.

हवी हवीशी ‘पंचायत’

31 जुलै रोजी प्राइमवर प्रदर्शित होणार्‍या ‘शकुंतला देवी’चे दिग्दर्शन ‘फोअर मोर शॉट’फेम अनु मेननने केले असून, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स प्रॉडक्शन्स व विक्रम मल्होत्रा (एबंडंशिया एंटरटेन्मेंट) यांनी याची निर्मिती केली आहे. सिनेमाची पटकथा अनु मेनन व नयनिका महतानी यांनी लिहिली असून, इशिता मोएत्राने संवाद लेखन केले आहे.
यामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालन प्रमुख भूमिकेत आहे. तिने’मानवी संगणक’म्हणून ओळखल्या जाणार्‍या जगप्रसिद्ध भारतीय बुद्धिमानी गणितज्ञाची भूमिका साकारली आहे.’शंकुतला देवी’चित्रपटामध्ये सन्या मल्होत्रा (दंगल,बधाई हो) देखील आहे. ती शंकुतला देवीच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. शंकुतला देवीचे तिच्या मुलीसोबत जटिल,पण असाधारण नाते होते. तसेच या चित्रपटामध्ये जीशू सेनगुप्ता (मर्दानी 2) आणि अमित साध (ब्रीद,काय पो चे) हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here