‘सुरमा भोपाळी’ काळाच्या पडद्याआड

मुंबई : 
शोले सिनेमातील ‘सुरमा भोपाळी’ जिवंत करणारे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप म्हणजेच सैयद इश्तियाक अहमद जाफरी यांचे मुंबईमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. प्रसिद्ध अभिनेते जावेद जाफरी आणि नावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. 

जगदीप यांचा जन्म २९ मार्च १९३९ रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात झाला होता. सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे जगदीप यांचे खरे नाव. बी.आर. चोप्रा यांच्या ‘अफसाना’ या सिनेमातून त्यांनी बाल कलाकार म्हणून कारकीर्द सुरु केली. बालकलाकार म्हणून त्यांनी अब दिल्ली दूर नही, मुन्ना व हम पंछी एक डाल के  हे सिनेमे केले. त्यानंतर बिमल रॉय यांच्या दो बीघा जमीन या चित्रपटाद्वारे विनोदी भूमिकेस सुरूवात केली. त्यांनी ३०० हून अधिक सिनेमांमध्ये विनोदी तथा चरित्र अभिनेत्याची भूमिका केली. ‘शोले’ सिनेमातील त्यांच्या भूमिकेमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. त्या सिनेमामुळे त्यांना सूरमा भोपाली म्हणून ओळखण्यात आले. हे नाव इतके प्रसिद्ध झाले की, त्यांनी या नावाचा एक सिनेमादेखील दिग्दर्शन देखील केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here