शंकर-एहसान-लॉयचे डिजिटल पदार्पण 

लॉकडाऊनमध्ये सारा देश घरामध्ये असल्यामुळे आता दरमहा नवनवीन वेबसिरीज प्रसारित होत आहेत. या मध्ये आघाडी घेतलेल्या अॅमेझॉन प्राइमनेदेखील आज ‘बंदिश बँडिट्स’ या रोमॅंटिक संगीतमय वेबसिरीजची घोषणा आज केली. ४ ऑगस्‍ट २०२० पासून ही सिरीज पाहता येणार आहे. 
अमृतपाल सिंग बिंद्रा (बॅण्‍ड बाजा बारात) यांची निर्मिती आणि आनंद तिवारी (लव्‍ह पर स्‍क्‍वेअर फूट) यांचे दिग्‍दर्शन असलेली नवीन अमेझॉन ओरिजिनल सिरीज वेगवेगळ्या संगीत पार्श्‍वभूमींमधून असलेल्‍या दोन तरूण परफॉर्मर्सच्‍या प्रेमकथेला सादर करते. दहा भागांच्‍या या सिरीजमध्‍ये रित्विक भौमिक (धुसर) हिंदुस्‍तानी शास्‍त्रीय कलाकार राधेच्‍या भूमिकेत आणि श्रेया चौधरी (डिअर माया) पॉपस्‍टार तमन्‍नाच्‍या भूमिकेत आहे.  त्याचप्रमाणे यामध्ये नसीरूद्दीन शाह, अतुल कुलकर्णी या दिग्गजांसोबत कुणाल रॉय कपूर, शीबा चड्ढा  आणि राजेश तैलंग आदी प्रसिद्ध कलाकार आहेत. ‘बंदिश बँडिट्स’च्या निमित्ताने दिग्‍गज संगीतकार त्रिकूट शंकर-एहसान-लॉय हेदेखील आपले डिजिटल पदार्पण करत आहेत. 
न्यू जर्सीत रंगणार मराठी चित्रपट महोत्सव

‘बंदिश बँडिट्स ही ख-या प्रेमाला दाखवणारी सिरीज आहे. आम्‍हाला जगभरात अद्वितीय ओरिजिनल कन्‍टेन्‍ट सादर करणा-या प्राइम व्हिडिओ सारख्‍या डायनॅमिक, जागतिक सेवेवर ही सिरीज सादर करण्‍याचा आनंद होत आहे,” असे ‘बंदिश बँडिट्स’चे निर्माता अमृतपाल सिंग बिंद्रा म्‍हणाले. ”या सिरीजचे घटक भारतीय परंपरा व मूल्‍यांमध्‍ये खोलवर रुजलेले आहेत. ही एक आधुनिक संगीतमय रोमँटिक सिरीज आहे, जी जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल. आम्‍ही प्राइम सदस्‍यांना प्रेम, मतभेद व आविष्‍काराच्‍या प्रवासावर घेऊन जाण्‍यासाठी उत्सुक आहोत.’
”बंदिश बँडिट्स ही अनेक गोष्‍टींमध्‍ये वेगवेगळ्या, पण अविश्‍वसनीयरित्‍या समान असलेल्‍या दोन व्‍यक्‍ती व संस्‍कृतींच्‍या मिलापाबाबतची कथा आहे,” असे ‘बंदिश बँडिट्स’चे दिग्‍दर्शक आनंद तिवारी म्‍हणाले. ”प्रत्‍येक पात्र अद्वितीय असण्‍यासोबत कथा देखील लक्षेवधक आहे. या सर्व कथा एकत्र येऊन या सिरीजला प्रबळ, रोमँटिक व वास्‍तविक बनवतात. मी दिग्‍गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांच्‍या मधुरमय संगीतामधून सुरेखरित्‍या सांगण्‍यात आलेली रोमांसची ही अविश्‍वसनीय कथा प्राइम व्हिडिओवर सादर करण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे.”   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here