आता ममता कुलकर्णीचा बायोपिक

‘स्टारडस्ट अफेअर’ या प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या आयुष्यावर आधारित बिलाल सिद्दीकी यांच्या पुस्तकावर आता सिनेमा येऊ घातला आहे. निर्माता निखिल द्विवेदीने या पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच वादग्रस्त ठरलेल्या ममताच्या आयुष्याबद्दल नेहमीच सगळ्यांना उत्सुकता राहिली होती. त्यामुळे या सिनेमामुळे ममताबद्दलच्या अनेक गोष्टीचा खुलासा होईल अशी अपेक्षा आहे. निखिलने अद्याप यावर अधिकृत काही सांगितले नसले तरी, सूत्रांनुसार बॉलिवूड स्टार होण्यापासून ते दाऊद इब्राहिमची प्रेयसी असल्याच्या आरोपातून ‘गॉडमदर’ होण्यापर्यंत ममता कुलकर्णी नेहमीच चर्चेत होती. आणि हा तिचा सगळा प्रवास असलेल्या या पुस्तकाचे हक्क निखिलने घेतले असून, या सिनेमाच्या पटकथेवर काम सुरु आहे.आणि लवकरच निर्माते याबद्दल अधिकृत घोषणा करतील.

रविवारी उघडणार ‘नागराजचा पिटारा’

बॉलिवूडमधून पूर्णपणे गायब झाल्यानंतर ममता केनियातील नैरोबी येथे स्थायिक झाल्याचे सांगण्यात आले होते, तिथे ती अध्यात्मिक जीवन जगत होती. पण त्यानंतर काही वर्षांपूर्वी ममता एका ड्रग रॅकेटच्या आरोपात त्याचे नाव समोर आले. थोडक्यात ममताचे आयुष्य हे एखाद्या अस्सल बॉलीवूडी सिनेमासारखेच आहे. त्यामुळे त्यावर सिनेमा न येता तरच नवल. दरम्यान, या सिनेमात ममताच्या भूमिकेत कोण अभिनेत्री असणार यावर अजून शिक्कामोर्तब झाले नसले तरी, लॉकडाऊननंतर पडद्यावरच्या ममताचा शोध सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here