४ ऑगस्ट पासून रंगणार ‘बंदिश बँडिट्स’

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने नुकताच बहुप्रतिक्षित नवीन अॅमेझॉन ओरिजिनल सिरीज ‘बंदिश बँडिट्स’चा ट्रेलर सादर केला. ४ ऑगस्‍ट पासून ही सिरीज पाहण्‍यास मिळेल. अमृतपाल सिंग बिंद्रा यांची निर्मिती आणि आनंद तिवारी यांचे दिग्‍दर्शन असलेली नवीन अॅमेझॉन ओरिजिनल सिरीज जोधपूर स्थित आहे. ही नवीन सिरीज विरूद्ध पार्श्‍वभूमी असलेल्‍या दोन तरूण संगीतकारांची कथा सादर करते. ‘बंदिश बँडिट्स’मध्‍ये दिग्‍गज संगीतकार त्रिकूट शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेला उत्‍साहवर्धक ओरिजिनल साऊंडट्रॅक आहे. हे संगीतकार या सिरीजच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे डिजिटल पदार्पण करत आहेत.
प्रमुख अभिनेता रित्विक भौमिकने सांगितले कि, ”माझे ‘बंदिश बँडिट्स’ सारख्‍या सिरीजमध्‍ये काम करण्‍याचे स्‍वप्‍न होते. माझ्या पदार्पणामध्‍ये नसीरूद्दीन शाह, राजेश तैलंग, शीबा चड्ढा व अतुल कुलकर्णी यासारख्‍या दिग्‍गज कलाकारांसोबत काम करण्‍याचा माझ्या जीवनातील सर्वात समाधानकारक अनुभव होता. ‘बंदिश बँडिट्स’मध्‍ये भारतीय संगीतामधील परंपरांचे सर्वोत्तम संयोजन आहे. या सिरीजमध्ये तरूण प्रेम, आकांक्षा, आवड व कौटुंबिक मूल्‍यांना सोप्‍या, पण प्रबळ पद्धतीने सुरेखरित्‍या दाखवण्‍यात आले आहे.”
‘माझी आनंद तिवारी यांच्‍यासोबत काम करण्‍याची अतीव इच्‍छा होती. म्‍हणून ‘बंदिश बँडिट्स’चा भाग असणे हा एक आकस्मिक लाभ आहे. मी कामासाठी आणि भारतातील सर्वात प्रतिभावान व दिग्‍गज कलाकारांकडून अभिनयाबाबत अधिक जाणून घेण्‍यासाठी या संधीपेक्षा अधिक विचार करु शकत नाही. माझ्या मते ही सिरीज संगीत व प्रेमाच्‍या हृदयस्‍पर्शी प्रवासाला सादर करते. मी आशा करते की, प्रेक्षक ही सिरीज पाहण्‍याचा मनमुराद आनंद घेतील,’ असे यातील प्रमुख अभिनेत्री श्रेया चौधरीने यावेळी नमूद केले.

शंकर-एहसान-लॉयचे डिजिटल पदार्पण 
 
दिग्‍गज अभिनेते नसीरूद्दीन शाह म्‍हणाले: ”मला भारतीय संगीताचे वास्‍तविक रूप, मोहकता व अस्‍सलता सुरेखरित्‍या सादर करणा-या या अद्वितीय संगीतमय ड्रामाचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. ही कथा माझ्यासाठी अत्‍यंत अपवादात्‍मक व खास आहे. या सिरीजमध्‍ये शास्‍त्रीय व पाश्चात्य संगीताचे मधुरमय संयोजन आहे आणि प्रेक्षकांना दोन्‍हींमधील सर्वोत्तम बाबी पाहायला मिळतील. या सिरीजमधील कन्‍टेन्‍ट सुरेखरित्‍या रचण्‍यात आला असून संपूर्ण कुटुंब एकत्र ही सिरीज पाहण्‍याचा आनंद घेऊ शकतात.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here