‘मॅडम सर’ टीम झाली गुप्तहेर

सोनी सबवरील  प्रसिद्ध मालिका ‘मॅडम सर’मधील मॅडम  मल्लिक व तिच्‍या टीमने एका नवीन आव्‍हानाचा सामना केला आहे.  लहान मुलगी झोयाचा गंभीर आजार अवयवांची तस्करी करणा-या दुष्‍ट रॅकेटचा उलगडा या मालिकेत करण्यात आला आहे. 
हसीनाचे निलंबन रद्द झाल्‍यानंतर हसीना (गुल्‍की जोशी) आणि करिष्‍मा (युक्‍ती कपूर) वादविवाद करत असतात. ठाण्यासमोरून  जात असलेली एक लहान मुलगी त्‍यांचा वादविवाद पाहते आणि ती त्‍यांच्‍यावर हसण्‍यास सुरूवात करते. या मुलीचे नाव झोया असते. ती हसीना व गुल्‍कीला पोलिसांच्‍या पोशाखामध्‍ये पाहिल्‍यानंतर भविष्‍यात पोलिस अधिकारी बनण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त करते. करिष्‍मा झोयाला ठाणे दाखवण्‍याचे ठरवते. मुलगी महिला पोलिस ठाण्यात प्रवेश करताच बेशुद्ध होते. पोलिस अधिकारी मुलीला जवळच्‍या हॉस्पिटलमध्‍ये घेऊन जातात. त्‍यांना समजते की, मुलीचे मूत्रपिंड निकामी झाले आहे आणि तिच्‍यावर त्‍वरित प्रत्‍यारोपण उपचार करण्‍याची गरज आहे. झोयाचे वडिल त्‍यांचे एक मूत्रपिंड दान करण्‍यास तयार होतात. पण त्‍यांच्‍या नकळत त्‍यांचे एक मूत्रपिंड काढून घेण्‍यात आल्‍याचे त्‍यांना माहित नसते. बेकायदेशीररित्‍या अवयव काढून घेण्‍याची गंभीर केस मॅडम सरसमोर आहे आणि त्‍या या दुष्‍ट रॅकेटचा उलगडा करण्‍याचे ठरवतात.
गुन्‍हेगारांना रंगेहाथ पकडण्‍याच्‍या उद्देशाने हसीना अवयवांचा व्‍यापार करणा-या या रॅकेटमागील सत्‍य जाणून घेण्‍यासाठी तिच्‍या टीमला एका गुप्‍त मिशनवर पाठवते. यादरम्‍यान झोयाची स्थिती खालावत जाते आणि ती जीवन-मृत्‍यूशी लढा देते.
‘तेरा क्या होगा आलिया’ नव्या रूपात 

हसीना मल्लिकची भूमिका साकारणारी गुल्‍की जोशी म्‍हणाली, ”हसीना मल्लिक निलंबन रद्द झाल्‍यानंतर पोलिस ठाण्यामध्येच कार्यरत राहते. पण तिच्‍यासमोर मोठी आव्हाने येणार आहेत. टीमला अवयवांचा व्‍यापार करणा-या एका घातक रॅकेटबाबत समजते. आगामी एपिसोड्समध्‍ये गोंडस लहान झोयाला पाहायला मिळणार आहे. तिची पोलिस अधिकारी बनण्‍याची इच्‍छा आहे, पण तिच्‍या आजारामुळे सर्वजण चिंतित होतात. या आठवड्यातील एपिसोड्स प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करत असलेले आपले योद्धे व डॉक्‍टरांना आणि त्‍यांच्‍या नि:स्‍वार्थ योगदानाला मानवंदना आहे. तसेच अवयवांचा व्‍यापार करणा-या रॅकेटचा उलगडा करणारी अॅक्‍शन-पॅक केस देखील पाहायला मिळणार आहे. तर मग मालिका पाहत राहा, जेथे हसीना मल्लिक रॅकेटचा उलगडा करण्‍यासाठी तिच्‍या टीमला गुप्‍त मिशनवर पाठवणार आहे.”  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here