नाट्यधर्मी निर्माता संघाची स्थापना 

महाराष्ट्रातील मराठी नाट्यनिर्मात्यांनी एकत्र येत जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाची नुकतीच स्थापना केली. अमेय खोपकर हे या संघटनेच्या अध्यक्षपदी असून, महेश मांजरेकर उपाध्यक्ष तर दिलीप जाधव यांची कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे.  नाटक मोठं करण्याच्या दृष्टीने आणि नाट्यव्यवसाय वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने ह्या नवीन निर्माता संघाची स्थापना करण्यात आली असून, त्यासाठी चांगली आणि व्यावसायिक नाटकांच्या निर्मिती प्रक्रियेत संघातील निर्मात्यांना पाठिंबा देणे. नाटक व्यवसाय मोठा होण्याच्या दृष्टीने पाऊल उचलणे. नाटक मुंबई-पुणे पुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्र, इतर राज्यात व देशाबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयोग होण्यासाठी प्रयत्नशील रहाणे. महाराष्ट्रातील नाट्यगृहांच्या अवस्थेविषयी आढावा घेऊन सुधारणांच्या दृष्टीने पाऊल उचलणे. प्रायोगिक नाटकांना राज्यस्तरावर सपोर्ट सिस्टम उभी करणे. नाटकांची प्रसिद्धी करण्यासाठी वर्तमानपत्रांसोबतच इतर माध्यमं उपलब्ध करून देणे. नाटक, OTT platform शी संलग्न करून देण्यासाठी प्रयत्न करणे. नाटक व्यवसायाचे ४ प्रमुख घटक = निर्माता, कलाकार, बॅकस्टेज आणि प्रेक्षक आहेत. या सर्वांच्या हितासाठी कटिबद्ध राहणार. नाट्यगृहांचे व्यवस्थापन आणि देखभाल संबंधी विचार आणि कृती आराखडा तयार करणे, या बाबींवर प्रामुख्याने हा संघ काम करणार असल्याचे प्रवक्ते  अनंत पणशीकर यांनी सांगितले.

लॉकडाऊन लव्ह : देशातील पहिले वर्च्युअल नाटक

‘जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ’ असे ह्या संघाचे नाव असल्याने नाटक करणारे सर्वच म्हणजे व्यावसायिक, हौशी, प्रायोगिक, समांतर सर्वांना सामावून घेण्याच्या दृष्टीने ही कार्यकारिणी प्रयत्नशील राहील तसेच दुसऱ्यांची रेष न पुसता आपली स्वतःची रेष मोठी करण्यातच आनंद वाटेल असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष अमेय खोपकर ह्यांनी या प्रसंगी केले.
नव्या संघाच्या सन्माननीय सल्लागारपदी लता नार्वेकर आणि प्रशांत दामले यांची निवड करण्यात आली आहे.  तर सहकार्यवाह: श्रीपाद पद्माकर, कोषाध्यक्ष: चंद्रकांत लोकरे, प्रवक्ता : अनंत पणशीकर आणि कार्यकारिणी सदस्य: सुनील बर्वे, नंदू कदम यांची निवड करण्यात आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here