मी न धावताच दमून गेलो…

Bandish Bandits

आयुष्यात मला दोन कलाकारांसोबत काम करण्‍याची इच्‍छा होती, ते म्‍हणजे शाहरूख खान आणि नसीरूद्दीन सर. ”नसीरूद्दीन शाह यांच्‍यासोबत काम करण्‍याचे माझे स्‍वप्‍न अखेर या मालिकेच्या माध्यमातून पूर्ण झाले. त्‍यांच्‍याकडून भरपूर काही शिकायला मिळते. एका सीक्‍वेन्‍सच्‍या शूटिंगदरम्‍यान मला दमल्‍यासारखे दिसायचे होते, जसे की मी ३ ते ४ किमी धावून आलो आहे. हा सीक्‍वेन्‍स करण्‍यासाठी खरेतर मी माझे कपडे पाण्‍यामध्‍ये भिजवले आणि दमल्‍यासारखे वाटण्‍यासाठी सेटवर धावत होतो. पण नसीरूद्दीन सरांनी माझी चूक सुधारली आणि सांगितले की मला तसे दिसण्‍यासाठी ३ ते ४ किमी धावावे लागेल. त्‍यानंतर त्‍यांनी मला साध्‍यासोप्‍या लाइफ-हॅक सांगण्‍यास सुरूवात केली, ज्‍यामुळे मला १० सेकदांपेक्षा कमी वेळेमध्‍ये दमल्‍यासारखे वाटेल. त्‍यांनी मला श्‍वास थांबवण्‍यास, उलटे होण्‍यास आणि डोक्‍यामध्‍ये रक्‍तप्रवाह वाढल्‍यानंतर पुन्‍हा सामान्‍य स्थितीमध्‍ये येण्‍यास सांगितले. हे केल्‍यानंतर मला वाटले की मी एका जागेवरून न हलता मैलो अंतर धावलो आहे.” अशा शब्दात बंदिशबंदिश बँडिट्स मधील रित्विक भौमिकने नसीरूद्दीन शाहसोबत काम करण्‍याच्‍या अनुभव सांगितला.
अॅमेझॉन प्राइमवर ४ ऑगस्‍ट पासून ही सिरीज पाहायला मिळेल. अमृतपाल सिंग बिंद्रा यांची निर्मिती आणि आनंद तिवारी यांचे दिग्‍दर्शन असलेली या मालिकेत विरूद्ध पार्श्‍वभूमी असलेल्‍या दोन तरूण संगीतकारांची कथा आहे. यात रित्विक भौमिक व श्रेया चौधरी प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच नसीरूद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, शीबा चड्ढा, हे कलाकार देखील इतर प्रमुख भूमिकेत आहेत. ‘बंदिश बँडिट्स’मध्‍ये दिग्‍गज संगीतकार त्रिकूट शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेले आहे. 
लायन्सगेटवर ‘फिल्मी स्लॅमबुक’
Bandish Bandits
‘बंदिश बँडिट्स’ ही राधे व तमन्‍नाची कथा आहे. राधे हा प्रतिभावान गायक असून त्‍याने त्‍याच्‍या आजोबांच्‍या शास्‍त्रीय संगीताच्‍या पावलांवर पाऊल ठेवण्‍याचा निर्धार केला आहे. तमन्‍ना ही उदयोन्‍मुख पॉप सेन्‍सेशन असून तिची भारताची पहिली आंतरराष्‍ट्रीय पॉपस्‍टार बनण्‍याची इच्‍छा आहे. राधे तमन्‍नाच्‍या प्रेमात पडतो तेव्‍हा त्‍याचे जीवन संकटमय होऊन जाते. तो तिचे सुपरस्‍टारडम बनण्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यामध्‍ये मदत आणि त्‍याचे स्‍वत:चे संगीत स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासोबत त्‍याच्‍या कुटुंबाचा वारसा पुढे घेण्‍याचा प्रयत्‍न यादरम्‍यान अडकला आहे. तो त्‍याच्‍याकडे असलेले सर्व गमावण्‍याचा धोका पत्‍करत या दोन्‍ही जबाबदा-या पूर्ण करण्‍यामध्‍ये यशस्‍वी होईल का? याचा वेध घेता येणार आहे. 
मनोरंजन क्षेत्रातील बातम्या इंग्रजीत वाचण्यासाठी क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here